पाकिस्तानमध्ये नेमकं काय सुरुय? खेळाडूंनी काढला मैदानातून पळ

| Updated on: Feb 05, 2023 | 8:28 PM

क्वेटातील नवाब अकबर बुगती स्टेडियमपासून काही अंतरावर हा अतिरेकी हल्ला झाला. या अतिरेकी हल्ल्यामुळे सामना मध्येच थांबवण्यात आला. तसेच या हल्ल्यात अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

पाकिस्तानमध्ये नेमकं काय सुरुय? खेळाडूंनी काढला मैदानातून पळ
Follow us on

इस्लामाबाद : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. एका बाजूला पाकिस्तान आशिया कप स्पर्धेच्या आयोजनासाठी अजूनही आग्रही आहे. आशिया कपचं आयोजन त्रयस्थ ठिकाणी केल्यास वनडे वर्ल्ड कपमध्ये न खेळण्याची धमकी दिलीय. तर दसुऱ्या बाजूला पाकिस्तानचा चेहरा उघडा पडलाय. लाईव्ह सामन्यादरम्यान क्वेटा शहरात दहशतवादी हल्ला झाल्याचा म्हटलं जात आहे. यामुळे पाकिस्तानचे स्टार खेळाडूंनी मैदानातून पळ काढला आहे. खेळाडूंनी जीव वाचवण्यासाठी ड्रेसिंग रुमपर्यंत धाव घेतली.

पाकिस्तान क्रिकेट लीग स्पर्धेतील प्रदर्शन सामना क्वेटात सुरु होता. या दरम्यान हा सर्व प्रकार घडला. मात्र यातून शाहिद आफ्रिदी, बाबर आझम आणि इतर खेळाडूंना सुरक्षितपणे ड्रेसिंग रुममध्ये नेलं.

हे सुद्धा वाचा

बाबर आझम आणि आफ्रिदी सुखरुप

क्वेटातील नवाब अकबर बुगती स्टेडियमपासून काही अंतरावर हा अतिरेकी हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे सामना मध्येच थांबवण्यात आला. यानंतर खबरदारी म्हणून आफ्रिदी आणि आजम या दोघांना ड्रेसिंग रुममध्ये पाठवण्यात आलं.

पाकिस्तानचे खेळाडू हे त्यांच्याच देशात सुरक्षित नाहीत. भारत पाकिस्तान या दोघांमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही संघ वर्ल्ड कप आणि आशिया कपमध्ये खेळतात. यंदाच्या आशिया कप स्पर्धेचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. मात्र ते सुरक्षिततेच्या दृष्टीने बदलण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

व्हीडिओ व्हायरल

मात्र आशिया कपचं आयोजन दुसऱ्या ठिकाणी केल्यास आम्ही आगामी 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याची धमकी पीसीबीने दिल्याचं सू्त्रांनी म्हटलंय. मात्र या दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यांच्या देशात यांचेच खेळाडू सुरक्षित नसतील, तर हे भारताच्या खेळाडूंची काय जबाबदारी घेणार, असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.

आधीपासूनच बीसीसीआय सचिव आणि एसीसीचे जय शाह हे पाकिस्तानमध्ये आशिया कपचं आयोजन न करण्यावर ठाम आहेत. मात्र आता या तणावपूर्ण स्थितीमुळे निश्चितच स्पर्धेचं आयोजन हे कुठे केलं जातं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.