VIDEO : ‘या’ फलंदाजाचा युवराजसारखा धमाका, एकाच ओव्हरमध्ये ठोकले 6 सिक्स

एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणं खायचं काम नाही. मात्र असे काही फलंदाज आहेत ज्यांनी हे शक्य करुन दाखवलंय. आता आणखी एका बॅट्समनने हा पराक्रम करुन दाखवला आहे.

VIDEO : या फलंदाजाचा युवराजसारखा धमाका, एकाच ओव्हरमध्ये ठोकले 6 सिक्स
| Updated on: Feb 05, 2023 | 5:33 PM

इस्लामाबाद : क्रिकेटमध्ये कधी काय होईल, हे सांगता येत नाही किंवा अंदाजही बांधता येत नाही. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक, हॅटट्रिकचं प्रमाण सध्या वाढलंय. मात्र एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकण्याचा कारनामा हा क्वचितच होतो. एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणं म्हणजे खाण्याचं काम नाही. टीम इंडियाकडून युवराज सिंह याने असा भीमपराक्रम केला आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत अवघ्या मोजक्याच फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. यात आता आणखी एका फलंदाजाचं नाव जोडलं गेलं आहे. एका आक्रमक बॅट्समनने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले आहेत. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

फलंदाजाने हा पराक्रम पाकिस्तान खेळवण्यात आलेल्या सामन्यात झाला. पाकिस्तानचा बॅट्समन इफ्तिखार अहमद याने ज्या बॉलरच्या बॉलिंगवर 6 सिक्स मारले तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा अंतरिम क्रीडा मंत्रीही आहे. इफ्तिखारने वहाब रियाजच्या बॉलिंगवर दे दणादण एका ओव्हरमध्ये 6 सिक्स ठोकले.

इफ्तिखारने क्वेटा ग्लेडिएटर्सकडून खेळताना पेशावर जालमी विरुद्ध 20 ओव्हरच्या या सामन्यात 50 बॉलमध्ये 94 धावांची खेळी केली. हा प्रदर्शनी सामना होता. याच सामन्यात इफ्तिखारने केलेल्या कारनाम्यामुळे क्रिकेट चाहतेही सुखावले.

इफ्तिखारचा धमाका

इफ्तिखारने हा कारनामा शेवटच्या ओव्हरमध्ये अर्थात 20 व्या ओव्हरमध्ये केला. वहाब रियाज ओव्हर टाकायला आला. तोवर इफ्तिखारच्या नावावर 42 बॉलमध्ये 50 धावा होत्या. मात्र त्यानंतर इफ्तिखारने 8 बॉलमध्ये 44 धावा कुटल्या.

युवराजचे 6 सिक्स

दरम्यान पहिल्यांदाच 2007 मध्ये टी 20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते. या वर्ल्ड कपमध्ये 19 सप्टेंबर ला टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सामना खेळण्यात आला. टीम इंडियाने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. काही विकेट्स पडल्यानंतर युवराज मैदानात आला.

बॅटिंगदरम्यान मैदानात इंग्लंडच्या अँड्रयू फ्ंलिटॉफने युवराजला डिवचलं. युवराजने याचा राग बॅटने काढला. स्टु्अर्ट ब्रॉड सामन्यातील 19 वी ओव्हर टाकायला आला.

युवराजने फ्लिंटॉफचा सर्व राग ब्रॉडवर काढला. युवराजने एकामागोमाग एक गगनचुंबी सिक्स खेचले. विशेष म्हणजे युवराजने 6 वा सिक्स खेचत अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.