R Ashwin : आर अश्विन महिला पंचासह भिडला, पायावर बॅट मारली, पाहा व्हीडिओ

R Ashwin and Umpire Controversy : आर अश्विन याला तामिळनाडू प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत महिला अंपायरने वादग्रस्त पद्धतीने आऊट दिलं. अश्विनने या दरम्यान पायावर बॅट मारत आपली नाराजी व्यक्त कली.

R Ashwin : आर अश्विन महिला पंचासह भिडला, पायावर बॅट मारली, पाहा व्हीडिओ
TNPL 2025 R Ashwin
Image Credit source: TNPL STAR SPORTS SCREENSHOT
| Updated on: Jun 09, 2025 | 2:05 PM

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर आर अश्विन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. मात्र अश्विनने लीग क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. अश्विन नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात सहभागी झाला. आयपीएलच्या 18 व्या मोसमाची सांगता झाल्यानंतर आर अश्विन आता टीएनपीएल 2025 अर्थात तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत खेळत आहे. अश्विन या स्पर्धेत डिंडीगुल ड्रॅग्सन टीमचं नेतृत्व करत आहे. अश्विनने या स्पर्धेत केलेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. अश्विनने नक्की काय केलं? जाणून घेऊयात.

टीएनपीएल 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात डिंडीगुल ड्रॅग्सन विरुद्ध आईड्रीम तिरुपूर तामिझन्स आमनेसामने होते. हा सामना एसएनआर कॉलेज क्रिकेट ग्राउंडमध्ये आयोजित करण्यात आला होता. आर अश्विन या सामन्यादरम्यान महिला पंचासह भिडला. नक्की काय झालं? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

अश्विन या स्पर्धेत ओपनिंग करतो. अश्विनने रविवारी टीमला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र आईड्रीम तिरुपूर तामिझन्स टीमचा कॅप्टन आर साई किशोर याने अश्विनला 18 धावांवर आऊट केलं. साईने अश्विनला एलबीडब्ल्यू केलं. इथून सर्व राडा झाला. साई किशोरच्या अपीलवर महिला पंचाने अश्विन बाद असल्याचा निर्णय दिला . मात्र अश्विनने अंपायरला बॉल लेग स्टंपच्या बाहेर असल्याचं सांगितलं. अश्विन महिला पंचासमोर आपली बाजू मांडत होता. मात्र पंचाने अंतिम निर्णय दिला होता.

जर बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे तर एलबीडब्ल्यू आऊट कसं काय? असा आक्षेप अश्विनने पंचाच्या या निर्णयावर घेतला. तसेच आपण कसे नॉट आऊट आहोत, हे अश्विनने पंचाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र पंचाने अश्विनचं ऐकलं नाही. त्यामुळे अश्विनला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळे नाराज अश्विनने मैदानाबाहेरच जाताना रागाच्या भरात स्वत:च्या पायावर बॅट मारली. अश्विनच्या या कृतीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर अश्विनने मैदानात काय केलं?

अश्विनच्या संघाचा लाजिरवाणा पराभव

दरम्यान अश्विनच्या संघाचा या सामन्यात लाजिरवाणा पराभव झाला. अश्विनच्या संघाला धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. अश्विनच्या संघाचं 16.2 ओव्हरमध्ये 93 रन्सवर पॅकअप झालं. प्रत्युत्तरात आर साई किशोरच्या संघाने 94 धावांचं विजयी आव्हान 11.5 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं.