
आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात गेल्या काही दिवसांपासून 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचीच चर्चाच पाहायला मिळत आहे. वैभवने 19 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पदार्पण केलं. वैभवने आयपीएल कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभवने त्या सामन्यात 20 चेंडूत 34 धावा केल्या. वैभवने दुसऱ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध 16 धावा केल्या. त्यानंतर वैभवने 28 एप्रिलला आपल्या कारकीर्दीतील तिसर्याच सामन्यात ते करुन दाखवलं जे कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमलं नाही. वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावलं. वैभवने यासह युसूफ पठाण याचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. वैभवने या सामन्यात एकूण 101 धावांची खेळी केली. वैभवने या खेळीसह असंख्य विक्रम आपल्या नावावर केलं. वैभवने अवघ्या 14 व्या वर्षी अनेक दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. मात्र वैभवने इतक्या कमी वयात आयपीएल कॉन्ट्रॅक्ट कसं मिळवलं? याबाबत अनेकांना उत्सूकता लागून आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. ...