AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs RCB Live Streaming : आरसीबी-राजस्थान आमनेसामने, कोण जिंकणार? सामना किती वाजता?

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru IPL 2026 Live Scorecard : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु दोन्ही संघ 19 व्या मोसमात आतापर्यंत अजिंक्य आहेत. त्यामुळे शुक्रवारी कोणतचा संघ अजिंक्य राहणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

RR vs RCB Live Streaming : आरसीबी-राजस्थान आमनेसामने, कोण जिंकणार? सामना किती वाजता?
RR vs RCB Live Streming and Preview IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 10, 2026 | 3:23 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) शुक्रवारी 2 चॅम्पियन संघ आमनेसामने असणार आहेत. पहिल्या मोसमातील चॅम्पियन टीम विरुद्ध गतविजेता यांच्यात ही लढत होणार आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात कडवी झुंज होणार आहे. राजस्थानचा हा चौथा तर आरसीबीचा हा तिसरा सामना असणार आहे. रियान पराग याच्याकडे राजस्थानच्या नेतृत्वाची सूत्रं आहेत. तर रजत पाटीदार आरसीबीचा कॅप्टन म्हणून जबाबदारी पाहणार आहे. उभयसंघातील सामना हा कधी आणि कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कधी?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना शुक्रवारी 10 एप्रिलला होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कुठे?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना हा गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मॅच मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

बंगळुरु राजस्थानवर वरचढ, पाहा आकडेवारी

दरम्यान राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 34 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. आरसीबीने या 34 पैकी राजस्थानच्या तुलनेत 3 सामने जास्त जिंकले आहेत. आरसीबीने 17 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर राजस्थानने आरसीबीचा 14 सामन्यांमध्ये धुव्वा उडवत विजय साकारला आहे.

तसेच गुवाहाटी हे राजस्थानचं दुसरं घर आहे. राजस्थानने गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला याच गुवाहाटीतील मैदानात पराभूत केलं होतं. तसेच राजस्थानने सलग 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे राजस्थानचा विश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणता संघ आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यात यशस्वी ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...