Duleep Trophy Final : सहकारी खेळाडूकडून झेल सुटला आणि रजत पाटीदाराने केलं असं, पाहा Video

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साउथ झोन आणि सेंट्रल झोन हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी साउथ झोनची हवा गुल झाली आणि संपूर्ण संघ 149 धावांवर तंबूत परतला. या सामन्यात कर्णधार रजत पाटीदारने जबरदस्त झेल पकडला.

Duleep Trophy Final : सहकारी खेळाडूकडून झेल सुटला आणि रजत पाटीदाराने केलं असं, पाहा Video
Duleep Trophy Final : सहकारी खेळाडूकडून झेल सुटला आणि रजत पाटीदाराने केलं असं, पाहा Video
Image Credit source: Screenshot/X
| Updated on: Sep 11, 2025 | 4:46 PM

दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साउथ झोन आणि सेंट्रल झोन यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीच कौल सेंट्रल झोनने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार रजत पाटीदाराचा हा निर्णय योग्य ठरला. कारण पहिल्याच दिवशी साउथ झोनचा संपूर्ण संघ 149 धावांवर तंबूत परतला. सेंट्रल झोनच्या गोलंदाजांनी मोठी भागीदारी होऊच दिली नाही. इतकंच काय क्षेत्ररक्षकांनीही जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. त्यामुळे साउथ झोनचा संघ बॅकफूटवर आला. कर्णधार रजत पाटीदार याने घेतलेला एक झेल तर चर्चेत राहिला. कारण हा झेल खरं तर डोळ्याची पापणी लवते न लवते तितक्या चतुरतेने घेतला. खरं तर हा झेल सुटलेला होता. पण रजत पाटीदारने संधीचं सोनं केलं. त्याने पकडलेल्या झेलचं कौतुक होत आहे. त्याने घेतलेल्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

साउथ झोनच्या डावातील 49 व्या षटकात रजत पाटीदारने हा जबरदस्त झेल घेतला. सेंट्रल झोनकडून हे षटक टाकण्यासाठी सारांश जैन आला होता. त्याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर साउथ झोनच्या डावखुरा फलंदाज सलमान निजार बचावात्मक खेळण्यास गेला. पण चेंडूने उसळी घेतली आणि बॅटच्या वरच्या भागाला लागून सिली पॉइंटजवळ असलेल्या खेळाडू गेला. काही सेकंदाच्या आत ही घडामोड घडली. जवळ उभा असलेल्या खेळाडूने झेल पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्याच्या हाती काही चेंडू बसला नाही आणि हातून उडाला. पण स्लिपला उभ्या असलेल्या रजत पाटीदारचं चेंडूकडे लक्ष होते. त्याने उडी घेत हा झेल पकडला. त्याची समयसूचकता पाहून मैदानातील प्रत्येक खेळाडू आवाक् झाला.

दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या डाव खऱ्या अर्थाने सेंट्रल झोनच्या नावावर राहिला. पहिल्या डावात साउथ झोनला फक्त 149 धावा करता आल्या. त्यामुळे सेंट्रल झोनकडे आघाडी घेण्याची संधी आहे. जर पहिल्या डावात सेंट्रल झोनने आघाडी घेतली तर विजयाच्या आशा पक्क्या होतील. कारण हा सामना ड्रा झाला आणि सेंट्रल झोनकडे पहिल्या डावात आघाडी असेल तर त्यांना विजयी घोषित केलं जाईल. साउथ झोनकडून तन्मय अग्रवालने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 76 चेंडूत 3 चौकार मारत 31 धावा केल्या. तर सलमान निजारने 24 चेंडूत 20 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर खेळाडूंची कामगिरी सुमार राहिली. या सामन्यात सारांश जैनने 24 षटकात 49 धावा देत 5 गडी बाद केले. तर कुमार कार्तिकेय सिंहने 21 षटकात 53 धावा देत 4 गडी बाद केले.