AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेत भारतीय खेळाडूने रचला इतिहास, पण कधी काळी जीवन संपवण्याचा आला होता विचार

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात दुबळ्या युएई संघाचा धुव्वा उडवला आहे. असं असताना पहिल्या सामन्यात भारताचा एक खेळाडू फॉर्मात आला आहे. कधी काळी त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता.

आशिया कप स्पर्धेत भारतीय खेळाडूने रचला इतिहास, पण कधी काळी जीवन संपवण्याचा आला होता विचार
आशिया कप स्पर्धेत भारतीय खेळाडूने रचला इतिहास, पण कधी काळी जीवन संपवण्याचा आला होता विचारImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 11, 2025 | 4:20 PM
Share

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे सुरुवात केली. पहिल्या संघात दुबळ्या युएई संघाला डोकंच वर काढू दिलं नाही. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर युएईचा संघ पत्त्यासारखा कोसळला. भारताने पहिला सामना 9 विकेट राखून जिंकला. युएईने विजयासाठी दिलेलं आव्हान भारताने फक्त 27 चेंडूत पूर्ण केलं हा देखील एक विक्रम आहे. यात महत्त्वाचा वाटा राहीला तो फिरकीपटू कुलदीप यादवचा.. इंग्लंडविरुद्धची मालिका त्याने बेंचवर बसून पाहिली. मात्र आशिया कप स्पर्धेत प्लेइंग 11 मध्ये संधी मिळताच त्याचं सोनं केलं. पहिल्याच सामन्यात कुलदीप यादवने फक्त 7 धावा देत 4 गडी बाद केले आणि नंबवर गोलंदाज म्हणून आशिया कप स्पर्धेत प्रवास सुरु केला आहे. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात देखील आलं. पण कधी काळी त्याच्या मनात आयुष्य संपवण्याचा विचार आला होता. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण याबाबत त्यानेच खुलासा केला होता.

कुलदीप यादवने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा 13 वर्षांचा होतो तेव्हा मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता. तेव्हा युपीच्या अंडर 15 संघात जागा मिळवण्यासाठी धडपड करत होता. पण तेव्हा कामगिरी चांगली राहिली नाही. त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत अडकला होतो. तेव्हा मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता. दरम्यान, कुलदीप यादवे नैराश्यावर मात केली आणि मेहनत केली. त्या मेहनतीचं फळ आज त्याला मिळत आहे. कुलदीप यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे.

कुलदीप यादवने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची संघात निवड केली गेली. पण पाचही सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. असं असूनही कुलदीप यादव प्रयत्न करत राहिला. अखेर त्याच्या नावाचा पुन्हा एकदा आशिया कप स्पर्धेत विचार झाला. त्याने प्लेइंग 11 मध्ये संधी गोलंदाजीची धार दाखवली. आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळवला. आता कुलदीप यादवकडून पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यातही अशाच अपेक्षा आहेत. भारत पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला होणार आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.