AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पहिल्याच सामन्यात विचित्र ड्रामा, युएईच्या फलंदाजाने रनआऊट झाल्यानंतरही केली बॅटिंग

आशिया कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने युएईसारख्या दुबळ्या संघाला अपेक्षेप्रमाणे चिरडलं. 57 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर दिलेलं आव्हान 4.3 षटकातच पूर्ण केलं. भारताने हा सामना 9 विकेटने जिंकला. पण या सामन्यात एक विचित्र प्रकार घडला.

Video : पहिल्याच सामन्यात विचित्र ड्रामा, युएईच्या फलंदाजाने रनआऊट झाल्यानंतरही केली बॅटिंग
Video : पहिल्याच सामन्यात विचित्र ड्रामा, युएईच्या फलंदाजाने रनआऊट झाल्यानंतरही केली बॅटिंगImage Credit source: video grab
| Updated on: Sep 10, 2025 | 10:30 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने युएईचा धुव्वा उडवला. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. क्रीडाप्रेमींच्या मते तर युएईला दोनदा फलंदाजी देणं आवश्यक होतं. हा गंमतीचा भाग सोडला तर भारताने पहिल्याच सामन्यात आपलं वरचष्मा दाखवला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीला आलेल्या युएई संघाचा कुलदीप यादव, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराहसमोर निभाव लागला नाही. भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा पाहता युएईच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पण या सामन्यात एक विषय चर्चेचा राहिला. सूर्यकुमार यादवच्या एका निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. युएईचा फलंदाज रनआऊट झाला होता. तसेच पंचांनी त्याला बादही घोषित केलं होतं. पण सूर्यकुमार यादवने हा निर्णय मान्य केला नाही. त्यामुळे युएईच्या फलंदाजाला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली.

भारताकडून 13 वं षटक टाकण्यासाठी शिवम दुबे आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर युएईची आठवी विकेट पडली. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर ध्रुव पराशर पायचीत झाला होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर असं काही झालं की रनआऊटवरून ड्रामा पाहायला मिळाला. शिवम दुबेने पराशरला बाउंसर टाकला. हा चेंडू पूल मारण्याच्या नादात चुकला. थेट विकेटकीपर संजू सॅमसनच्या हाती गेला. संजू सॅमसनने चेंडू हातात येताच स्टंपच्या दिशेने मारला. बेल्स उडाल्यानंतर टीम इंडियाने अपली केली. तेव्हा मैदानी पंचांनी अपीलसाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. रिप्ले पाहिल्यानंतर पराशर बाद असल्याच स्पष्ट झालं.

पंचांच्या निर्णयानंतर युएईच्या फलंदाजाने क्रीज काही सोडली नाही. कारण सूर्यकुमार यादव पंचांशी काहीतरी बोलत होता. त्याने रनआऊटसाठी केलेली अपील मागे घेतली. याचं कारण शिवम दुबे होता. चेंडू टाकण्यासाठी धावत असताना त्याचा रुमाल खाली पडला होता. शॉट मारताना चुकल्यानंतर पराशरने पंचांकडे तक्रार केली. या गडबडीत क्रीझवर परतण्याची चूक केली. अशा स्थितीत फलंदाजाचं लक्ष विचलित होते आणि क्रिझवर परतण्याचं विसरून जातो. त्यामुळे पंच डेड बॉल देतात. पण यावेळी फलंदाज बाजूला झाला नाही आणि पंचांनी डेड बॉल दिला नाही. त्यामुळे भारतीय कर्णधार सूर्यकुमारने त्याची तक्रार योग्य मानत अपील मागे घेतली.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.