Irani Cup : रणजी चॅम्पियन विदर्भने पटकावलं इराणी कप जेतेपद, रेस्ट ऑफ इंडियाचा 93 धावांनी पराभव

इराणी कप 2025-26 स्पर्धेचं जेतेपद विदर्भाने पटकावलं. रणजी चॅम्पियन विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात सामना रंगला होता. हा सामना विदर्भ संघाने 93 धावांनी जिंकला. यासह या स्पर्धेवर तिसऱ्यांदा नाव कोरलं.

Irani Cup : रणजी चॅम्पियन विदर्भने पटकावलं इराणी कप जेतेपद, रेस्ट ऑफ इंडियाचा 93 धावांनी पराभव
Irani Cup : रणजी चॅम्पियन विदर्भने पटकावलं इराणी कप जेतेपद, रेस्ट ऑफ इंडियाचा 93 धावांनी पराभव
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 05, 2025 | 4:18 PM

इराणी कप 2025-26 स्पर्धेत रणजी चॅम्पियन विदर्भ आणि रेस्ट ऑफ इंडिया हे संघ आमनेसामने आले होते. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात हा सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल विदर्भाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात 342 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना विदर्भने 214 धावा केल्या. यासह विदर्भने पहिल्या डावात 128 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात विदर्भने 232 धावा केल्या. पहिल्या डावातील आघाडी मिळून 360 धावांचं आव्हान दिलं. पण रेस्ट ऑफ इंडिया दुसऱ्या डावात फक्त 267 धावाच करू शकली. विदर्भने या सामन्यात 93 धावांनी विजय मिळवला. विदर्भने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. यापूर्वी 2017-18 आणि 2018-19 मध्ये जेतेपद मिळवलं होतं.

पहिल्या डावात विदर्भकडून अथर्व तायडेने 143 दावांची खेळी केली होती. तसेच मधल्या फळीत यश राठोडने 91 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे विदर्भने पहिल्या डावात 342 धावांपर्यंत मजल मारली. रेस्ट ऑफ इंडियाकडून पहिल्या डावात मानव सुथार आणि आकाश दीपने प्रत्येकी 3 विकेट काढल्या, तर सारांश जैनला 2 विकेट मिळाल्या. तसेच अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रारने प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिल्या डावात रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू ईश्वरन आणि रजत पाटीदार वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. विदर्भकडून यश ठाकुरने सर्वाधिक 4 विकेट काढल्या. तर हर्ष दुबे 2, पार्थ रेखाडे 2, आदित्य ठाकरे 1 आणि दर्शन नायंकडे 1 गडी बाद केला.

दुसऱ्या डावात विदर्भकडून फार काही चांगली खेळी झाली नाही. पण प्रत्येकाने काही ना काही योगदान दिलं. अमन मोखाडेने 37, आकाश वाडकरने 36, दर्शन नायकांडेने 35 धावा केल्या. रेस्ट ऑफ इंडियाकडून अंशुल कंबोजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर सारांश जैनने 2, गुरनूर ब्रारने 2 आणि मानव सुथारने 2 गडी बाद केले. विजयासाठी मिळालेल्या 360 धावांचा पाठलाग करताना रेस्ट ऑफ इंडियाला धक्के बसले. मधल्या फळीत फक्त यश धूलने 92, तर मानव सुथारने 56 धावांची खेळी केली. याशिवाय मोठी कामगिरी करण्यात अपयश आलं. विदर्भकडून हर्ष दुबेने 4, आदित्य ठाकरेने 2, यश ठाकुरने 2, पार्थ रेखाडेने 1 आणि दर्शन नाइकंडेने 1 विकेट घेतली.