बीसीसीआयची धावाधाव! सामन्यापूर्वी चार खेळाडूंची तब्येत बिघडली, हॉटेलमधील खाण्याचे नमुने घेतले ताब्यात
ऑस्ट्रेलिया आणि भारत अ संघात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी ट्वीस्ट आला. चार खेळाडूंची तब्येत बिघडल्याने धावाधाव करावी लागली. या प्रकरणी बीसीसीआयचे आजन्म उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं वक्तव्य समोर आलं आहे.

भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघात शेवटचा वनडे सामना होत आहे. या सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कानपूरमध्ये ऑस्ट्रेलियाचे 4 खेळाडू अचानक आजारी पडले आहेत. खेळाडूंच्या पोटात दुखत असून संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खेळाडूंना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज हेन्री थॉर्नटला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उर्वरित खेळाडूंनाही रुग्णालयात नेण्यात आले आणि तपासणीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. हॉटेलमधील जेवण खाल्ल्यानंतर त्यांना पोटात संसर्ग झाल्याचे वृत्त समोर आले. ऑस्ट्रेलियन अ संघ कानपूरमधील लँडमार्क हॉटेलमध्ये राहत असन त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी बीसीसीआयची धावाधाव सुरु झाली असून उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
अन्न विभागाने कारवाई करून हॉटेलमधील अन्नाचे नमुने ताब्यात घेतले आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, “लँडमार्क हॉटेल हे कानपूरमधील सर्वोत्तम हॉटेल आहे. जर जेवणात काही कमतरता असती तर सर्व खेळाडू आजारी पडले असते. पण तसं काही झालेलं नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना हॉटेलमधील दर्जेदार जेवण दिले जात आहे. सर्व खेळाडू सारखेच अन्न खात आहेत. कदाचित 2-4 खेळाडूंना इतरत्र संसर्ग झाला असेल.” दुसरीकडे, हॉटेल व्यवस्थापनाने अन्नातून विषबाधा झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू हवामान बदलामुळे आजारी पडल्याचं हॉटेल व्यवस्थापनाचं म्हणणं आहे.
Kanpur, UP: During the IND A vs AUS A match, some Australian players fell ill. The Food Department has collected samples of several food items from the Landmark Hotel for testing
Congress MP Rajeev Shukla says, “If there was anything wrong with the food, all India-Australia… pic.twitter.com/NLVeAC4rFh
— IANS (@ians_india) October 5, 2025
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा आणि महत्त्वाचा सामना सुरु आहे. या सामन्यात हेन्री थॉर्नट खेळत नाही. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका भारताने 1-0 ने जिंकली होती. दरम्यान, भारतीय संघ शुबमन गिलच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्त्वात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड झाली आहे. तर 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळणार आहे.
