रणजी ट्रॉफीत मोठा ड्रामा! सामना सुरू होण्याआधीच संपूर्ण संघ निलंबित, नव्या टीमची एन्ट्री; मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त, काय घडलं?

Meghalaya Ranji Team News: मेघालयच्या रणजी ट्रॉफी संघातील खेळाडूंना निलंबित करून त्यांच्या जागी नवीन संघ आणण्यात आला आहे. सर्वोच्च परिषद आणि मंडळाचे अध्यक्ष जेम्स संगमा यांच्यात वाद निर्माण झाला होता.

रणजी ट्रॉफीत मोठा ड्रामा! सामना सुरू होण्याआधीच संपूर्ण संघ निलंबित, नव्या टीमची एन्ट्री; मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त, काय घडलं?
Meghalaya Cricket Association Rift Hits Ranji Team
| Updated on: Nov 03, 2026 | 11:21 PM

अरुणाचल प्रदेशनंतर आता मेघालय क्रिकेट संघही क्रिकेट बोर्डातील अंतर्गत वादाचा बळी ठरला आहे. नागालँडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुप सामन्याच्या अवघ्या एक दिवस आधी संपूर्ण संघाला निलंबित करून त्यांच्या जागी नवीन संघ आणण्यात आल्याचे वृत्त आहे. मेघालय क्रिकेट असोसिएशनच्या सर्वोच्च परिषदेने पहिल्या तीन रणजी ट्रॉफी सामन्यांसाठी संघाची निवड केली.

नागालँडविरुद्धच्या सामन्याच्या केवळ एक दिवस आधी मेघालयाच्या रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुप संघाला मोठा धक्का बसला आहे. लैंगिक छळाच्या तक्रारी दडपल्याचा आरोप असलेले असोसिएशनचे सचिव रेनॉल्ड खरकमानी यांच्या निलंबनावरून सर्वोच्च परिषद आणि मंडळाचे अध्यक्ष जेम्स संगमा यांच्यात वाद निर्माण झाला होता. अंतर्गत कलहामुळे संघाला निलंबित करून त्याच्या जागी नवीन संघ आणण्यात आला. खेळाडूंनी सराव केला होता. सामनाधिकाऱ्यांसोबत एका बैठकीलाही हजेरी लावली होती. पण संध्याकाळपर्यंत त्यांना कळले की, ते आता राज्य संघटनेचा अधिकृत संघ राहिलेले नाहीत.

Loading...

फलंदाज राहुल दलाल म्हणाला, आम्ही सर्वजण सरावासाठी गेलो होतो आणि सामनाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले, काळजी करू नका. तुम्ही खेळाल कारण बीसीसीआयने तुम्हाला स्वीकारले आहे. संध्याकाळी आम्हाला सामनाधिकाऱ्यांचा फोन आला की, आम्हाला आता खेळण्याची परवानगी नाही. हा संपूर्ण वाद मेघालय क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जेम्स संगमा आणि त्यांची सर्वोच्च परिषद यांच्यातील गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादातून उद्भवला आहे.

या प्रकरणाने कायदेशीर लढाईचे स्वरूप घेतले. ज्यात राज्य उच्च न्यायालयाने संगमा यांच्या बाजूने निकाल दिला. सर्वोच्च परिषदेने निवडलेला संघ, ज्याने आधीच तीन फेऱ्या खेळल्या होत्या. तो न्यायालयाने अवैध ठरवला. खेळाडूंच्या लैंगिक छळाच्या तक्रारी दडपल्याचा आरोप असलेले सचिव रेनॉल्ड खरकमानी यांच्या निलंबनामुळे या संघर्षाला सुरुवात झाली. खरकमणीच्या गटाने अपील केले, परंतु उच्च न्यायालयाने निलंबन कायम ठेवले.

त्याअंतर्गत पारित केलेले सर्व ठराव अवैध घोषित केले. त्यानंतर संगमाच्या गटाने एपेक्स कौन्सिलने निवडलेल्या सर्व खेळाडूंना वगळून घाईघाईने एक नवीन संघ निवडला. यामुळे अनेक खेळाडूंचे भवितव्य अधांतरी राहिले आहे. बीसीसीआयला या संपूर्ण घडामोडीची माहिती आहे. बीसीसीआयचे सचिव देबजित सैकिया यांनी सांगितले की, मेघालय उच्च न्यायालयात अध्यक्षांचा गट आणि सचिव यांच्यात एक खटला सुरू आहे. अलीकडेच न्यायालयाने अध्यक्षांच्या गटाच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांनी संघाची निवड केली.” संगमा यांनी या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us