Ranji Trophy: मोहम्मद अजहरूद्दीनने 175 चेंडूत शतक ठोकूनही रचला विक्रम, काय ते जाणून घ्या

रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गुजरात आणि केरळ हे संघ आमनेसामने आहेत. उपांत्य फेरीच्या या सामन्यात केरळचा विकेटकीपर मोहम्मद अजहररूद्दीन याने आक्रमक खेळी केली. शतकी खेळीसह त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Ranji Trophy: मोहम्मद अजहरूद्दीनने 175 चेंडूत शतक ठोकूनही रचला विक्रम, काय ते जाणून घ्या
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 18, 2025 | 5:16 PM

रणजी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नाणेफेकीचा कौल जिंकून केरळने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात केरळने गुजरातच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत असून केरळचा संघ मजबूत स्थितीत आहे. केरळसाठी पाचव्या स्थानावर फलंदाजीला उतरत मोहम्मद अजहरूद्दीन याने शतक ठोकलं. तर त्याला कर्णधार सचिन बेबी आणि सलमान निझार यांच्या अर्धशतकी खेळीची भागीदारी मिळाली. त्यामुळे केरळला पहिल्या डावात 400 पार धावा करता आल्या. अजहरूद्दीने रणजी स्पर्धेत शतकी खेळी करत केरळसाठी अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. तर उपांत्य फेरीत केरळसाठी शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. उपांत्य फेरीत त्याने हा इतिहास रचला आहे. मोहम्मद अजहरूद्दीन याने 175 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याच्या शतकी खेळीमुळे केरळचा संघ आता मजबूत स्थिती आहेत

पहिल्या दिवशी अझरुद्दीन फलंदाजीला आला तेव्हा त्याचा संघ 4 बाद 157 धावा अशी स्थिती होती. त्यानंतर त्याने कर्णधार सचिन बेबीसोबत स्थिर भागीदारी करत संघाला पहिल्या दिवसअखेर 4 बाद 206 धावांपर्यंत पोहोचवले. मोहम्मद अजहरूद्दीन याने सहाव्या विकेटसाठी सलमान निजारसोबत 149 अधिक धावांची भागीदारी केली. मोहम्मद अजहरूद्दीन याचं फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे दुसरं शतक आहे. तर 11 अर्धशतक ठोकले आहेत. दुसऱ्या दिवशीही केरळने फलंदाजी केल्याने आता गुजरात संघावर दडपण वाढलं आहे. मोहम्मद रिझवानने आपली दीड शतकी खेळीही पूर्ण केली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

केरळ (प्लेइंग इलेव्हन): अक्षय चंद्रन, रोहन कुन्नम्मल, सचिन बेबी (कर्णधार), जलज सक्सेना, सलमान निझार, वरुण नयनार, मोहम्मद अजहरुद्दीन (विकेटकीपर), आदित्य सरवटे, अहमद इम्रान, एमडी निधीश, नेदुमनकुझी बेसिल.

गुजरात (प्लेइंग इलेव्हन): प्रियांक पांचाल, आर्या देसाई, सिद्धार्थ देसाई, मनन हिंगराजिया, जयमीत पटेल, उर्विल पटेल (विकेटकीपर), चिंतन गजा (कर्णधार), विशाल जयस्वाल, रवी बिश्नोई, अरझान नागवासवाला, प्रियाजितसिंग जडेजा