Double Century : मुंबईकर फलंदाजाचा गुवाहाटीत तडाखा, ठोकलं द्विशतक

| Updated on: Jan 10, 2023 | 6:48 PM

टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 374 धावांचं मजबूत आव्हान दिलंय. तर दुसऱ्या बाजूला गुवाहाटीतच मुंबईकर खेळाडूने धमाका केलाय.

Double Century : मुंबईकर फलंदाजाचा गुवाहाटीत तडाखा, ठोकलं द्विशतक
Follow us on

Prithvi Shaw Double Century : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिला वनडे सामन्याचं आयोजन हे गुवाहाटीतील (Guwahati) बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलंय. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 374 धावांचं मजबूत आव्हान दिलंय. तर दुसऱ्या बाजूला गुवाहाटीतच मुंबईकर खेळाडूने धमाका केलाय. नववर्षात या फलंदाजाने द्विशतक (Double Century) ठोकत दमदार सुरुवात केलीय. (ranji trophy mum vs as mumbai batsman prithvi shaw hit double century against assam amingaon cricket ground at guwahati)

पृथ्वी शॉने हा द्विशतकी धमाका केलाय. पृथ्वीने रणजी करंडकात आसाम विरुद्ध पहिल्याच दिवशी द्विशतक ठोकलंय. पहिल्या दिवसाचा खेळ संपला मुंबईची धावसंख्या 90 ओव्हरमध्ये 2 बाद 397 अशी होती. तसेच पृथ्वी पहिलादिवसखेर 240 धावांवर नाबाद होता. तर कर्णधार अजिंक्य रहाणे 73 रन्स करुन नॉट आऊट आहे. या दोघांव्यतिरिक्त मुशीर खान याने 42 रन्स केल्या. तर अरमान जाफर 27 धावा करुन माघारी परतला.

33 चौकार आणि 1 सिक्स

पृथ्वीने नाबाद 240 धावांच्या खेळीत 33 चौकार आणि 1 सिक्स ठोकला. दरम्यान या खेळीदरम्यान पृथ्वीने स्वत:चा रेकॉर्ड ब्रेक केलाय. याआधी पृथ्वीचा प्रथम श्रेणीतील हायस्कोर हा 202 रन्स इतका होता.

हे सुद्धा वाचा

दरम्यान आता पृथ्वीकडून सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्रिशतकाची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पृथ्वी असाच धमाका सुरु ठेवतो का, या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

निवड समिती संधी देणार का?

दरम्यान पृथ्वी गेल्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. निवड समिती पृथ्वीकडे सातत्याने दुर्लक्ष करतेय. मात्र आता पृथ्वीने द्विशतक ठोकत पुन्हा निवड समितीला चपराक लगावलीय. त्यामुळे या द्विशतकी खेळीनंतरतरी निवड समिती पृथ्वीला संधी देणार का, असा सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : अजिंक्य रहाणे (कॅप्टन), पृथ्वी शॉ, मोहित अवस्थी, प्रसाद पवार (विकेटकीपर), सरफराज खान, रॉयस्टन डायस, अरमान जाफर, शार्दुल ठाकूर, मुशीर खान, शम्स मुलानी आणि तनुष कोटियन.

आसाम प्लेइंग इलेव्हन : गोकुल शर्मा (कर्णधार), अभिषेक ठाकुरी (विकेटकीपर), मुख्तार हुसेन, राहुल हजारिका, ऋषव दास, रियान पराग, हृदीप डेका, स्वरूपम पुरकायस्थ, सिबशंकर रॉय, सुभम मंडल आणि रोशन आलम.