IPL सुरु असताना आमदार पत्नीसह रविंद्र जडेजा पंतप्रधान मोदींच्या भेटीला

IPL सामने सुरु असताना भारताचा क्रिकेटर रविंद्र जडेजा पत्नी रिवाबा जडेजा सोबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यासाठी पोहोचला.

IPL सुरु असताना आमदार पत्नीसह रविंद्र जडेजा पंतप्रधान मोदींच्या भेटीला
| Updated on: May 16, 2023 | 8:46 PM

नवी दिल्ली : सध्या भारतात आयपीएलची धूम पाहायला मिळत आहेत. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी सगळेच संघ प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे वर्ल्डकप देखील येत आहे. त्यामुळे चांगली कामगिरी करत संघात आपलं स्थान पक्क करण्यासाठी देखील खेळाडूंचा प्रयत्न असणार आहे.  IPL सुरु असतानाच भारताचा स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजा पत्नी रिवाबा जडेजा सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पोहोचला. आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना होणार आहे. त्यामुळे दिल्लीत असल्याने रवींद्र जडेजा पत्नी रिवाबा सोबत पंतप्रधान मोदींना भेटायला पोहोचला. रिबाबा जडेजा भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. त्या गुजरातमध्ये भाजपच्या आमदार आहेत.

जडेजाने घेतली मोदींची भे

रवींद्र जडेजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने लिहिले की, नरेंद्र मोदी सर तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आपण आपल्या मातृभूमीसाठी कठोर परिश्रम आणि समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण आहात! मला खात्री आहे की तुम्ही सर्वांना प्रेरणा देत राहाल.

जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये

रवींद्र जडेजासाठी आयपीएल 2022 काही खास नव्हते. सुरुवातीला त्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते, परंतु त्याला पायउतार व्हावे लागले होते. संघ पराभूत होत असल्याने आणि त्याची कामगिरीही निराशाजनक होती. त्यानंतर दुखापतीमुळे तो लीगमधून बाहेर पडला होता. चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन आणि जडेजा यांच्यात वाद झाल्याचे वृत्त होते. पण आयपीएल 2023 मध्ये तो संघासाठी खेळण्यासाठी आला आणि तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.

रवींद्र जडेजाच्या नावावर आतापर्यंत 13 सामन्यांत 16 विकेट्स आहेत. फलंदाजीतहीन त्याने 133 धावा केल्या आहेत. २० मे रोजी चेन्नई सुपर किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्स सोबत होणार आहे. त्या सामन्यातील विजयामुळे संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.