RCB vs CSK IPL 2022: मुकेशचा थ्रो विराटला जोरात लागला, अशी होती कोहलीची Reaction, पहा VIDEO

| Updated on: May 04, 2022 | 8:47 PM

RCB vs CSK IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कॅप्टन एमएस धोनीने मुकेश चौधरीला पहिलं षटक दिलं. समोर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची जोडी होती.

RCB vs CSK IPL 2022: मुकेशचा थ्रो विराटला जोरात लागला, अशी होती कोहलीची Reaction, पहा VIDEO
mukesh choudhary
Image Credit source: ipl/twitter
Follow us on

मुंबई: विराट कोहली (Virat kohli) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नाहीय. पण भारतीय क्रिकेटमधला (Indina Cricket) तो एक मोठा स्टार आहे. अनेक युवा खेळाडू विराटला आपला आदर्श मानतात. त्याचा आदर करतात. विराट कोहलीमध्ये अजूनही बरचं क्रिकेट शिल्लक आहे. विराट कोहली आता रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचाच (RCB) नव्हे, तर भारतीय क्रिकेट संघाचाही कॅप्टन नाहीय. पण युवा खेळाडूंमध्ये कोहलीची एक क्रेझ आहे. त्याची एक वेगळी प्रतिमा आहे. विराट कोहली सोबत खेळताना युवा खेळाडू त्याच्यावर आपली एक छाप उमटवण्याचा प्रयत्न करतात. त्याची नाराजी ओढवून घेण्याची कोणाचीही इच्छा नसणार हे सहाजिक आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स सामन्यादरम्यान असाच एक प्रकार घडला.

तो बॉल विराटला लागला

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा कॅप्टन एमएस धोनीने मुकेश चौधरीला पहिलं षटक दिलं. समोर विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची जोडी होती. मुकेशने चांगली ओव्हर टाकली. पण शेवटचा चेंडू विराटने सरळ मारला. चेंडू मुकेशच्या हातात गेला. विराटने क्रीझ सोडला होता. म्हणून मुकेशने रनआऊट करण्यासाठी चेंडू स्टम्पसच्या दिशेने फेकला. पण तो बॉल विराटला लागला. त्यानंतर मुकेशने लगेच त्याची माफी मागितली. विराटने हसून त्याला थम्पअप केलं. खरंतर विराट कोहली हा आक्रमक क्रिकेटपटू आहे. मैदानावर तो प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला जशास तस उत्तर देण्यासाठी ओळखला जातो. दोन वर्षापूर्वी आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव बरोबर पंगा घेतला होता.

अप्रतिम चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला

मागच्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात विराटने अर्धशतकी खेळी करुन फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले होते. आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्धही त्याने चांगली सुरुवात केली होती. पण मोइन अलीच्या एका अप्रतिम चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. त्याने 33 चेंडूत 30 धावा केल्या. यात तीन चौकार आणि एक षटकार होता. विराटचा यंदाच्या आयपीएलमध्ये धावांसाठी संघर्ष सुरु आहे. वनडाऊन येणारा विराट आता ओपनिंगला येतोय.