RCB vs KKR IPL 2022: RCB ने सोपा विजय अवघड बनवला, ‘ते’ दोघे ठरले गेमचेंजर

| Updated on: Mar 31, 2022 | 12:24 AM

RCB vs KKR IPL 2022: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) अखेर विजयाचं खात उघडलं आहे. टी-20 क्रिकेटचं स्वरुप बघता 128 ही तशी नीचांकी धावसंख्या. सहज, सोपं, साध्य होणार लक्ष्य.

RCB vs KKR IPL 2022: RCB ने सोपा विजय अवघड बनवला, ते दोघे ठरले गेमचेंजर
IPL 2022 मध्ये RCB ने विजयाचं खातं उघडलं
Image Credit source: IPL
Follow us on

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) अखेर विजयाचं खात उघडलं आहे. टी-20 क्रिकेटचं स्वरुप बघता 128 ही तशी नीचांकी धावसंख्या. सहज, सोपं, साध्य होणार लक्ष्य. पण 129 धावांच्या विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची चांगलीच दमछाक झाली. त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. कॅप्टन फाफ डु प्लेसिस, विराट कोहली (Virat Kohli) असे मोठे फलंदाज असलेल्या RCB ला कोलकाता नाइट रायडर्सच्या (KKR) गोलंदाजांनी चांगलच सतावलं. आणखी 15-20 धावा कोलकात्याने केल्या असत्या, तर या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. मागच्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 205 धावा करणारा हाच तो आरसीबीचा संघ का? असा प्रश्न आजचा त्यांचा खेळ पाहून पडला. पण अखेरीस कसाबसा आरसीबीने हा सामना जिंकला. आरसीबीने सामना जिंकला असला, तरी कोलकात्याच्या गोलंदाजांना श्रेय द्यावच लागेल. उमेश यादव, टिम साउदी, सुनील नरेन यांनी टिच्चून मारा केला.

  1. आज आरसीबीने आपल्या गोलंदाजीत सुधारणा केली. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यानंतर आरसीबीच्या गोलंदाजीबद्दल प्रश्न निर्माण झाला होता. पण आज त्यांच्या गोलंदाजांनी सर्वांचेच अंदाज चुकीचे ठरवले. आकाश दीपने वेंकटेश अय्यरची विकेट काढून सुरुवात करुन दिली. त्यानंतर वानिंदु हसरंगाने त्यावर कळस चढवला. त्याने चार विकेट घेऊन KKR चं कंबरड मोडलं.
  2. हर्षल पटेलनेही आज आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं. त्याने चार षटकात 11 धावा देत दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. दोन षटकं त्याने निर्धाव टाकली. सॅम बिलिंग्स आणि आंद्रे रसेल हे दोन महत्त्वाचे विकेट त्याने काढले.
  3. आरसीबीचा संघ फलंदाजीला उतरल्यानंतर त्यांच्या पहिल्या तीन विकेट झटपट गेल्या. विराट कोहली, फाफ डु प्लेसीस हे प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर डेविड विली आणि रुदरफोर्डने डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. रुदरफोर्डच्या 28 धावा महत्त्वाच्या होत्या.
  4. शाहबाज अहमदची 27 धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. धावफलक हलता ठेवण्याची गरज असताना त्याने या धावा केल्या. संघावर दबाव वाढणार नाही याची त्याने काळजी घेतली. या खेळीत त्याने तीन षटकार लगावले.
  5. शेवटच्या दोन षटकांमध्ये सामना निर्णायक वळणावर असताना दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी केलेल्या अनुक्रमे 14 आणि 10 धावा निर्णायक ठरल्या. हर्षल पटेलने 19 व्या ओव्हरमध्ये लगावलेले दोन चौकार आणि शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने एक षटकार आणि चौकार ठोकून आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.