AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs KKR : विराटचा शतकी तडाखा, आरसीबीचा जबरदस्त विजय, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा

Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders, Match Result : रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने केकेआरवर एकतर्फी फरकाने विजय मिळवत 2 गुणांची कमाई केली.

RCB vs KKR : विराटचा शतकी तडाखा, आरसीबीचा जबरदस्त विजय, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा
Virat Kohli and Devdutt PadikkalImage Credit source: Bcci
| Updated on: May 14, 2026 | 9:09 AM
Share

अनुभवी फलंदाज विराट कोहली याने केलेल्या नाबाद आणि विस्फोटक शतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकाता नाईट रायडर्सवर आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) 57 व्या सामन्यात जबरदस्त असा विजय मिळवला आहे. अंगकृष रघुवंशी आणि रिंकु सिंह या दोघांनी केलेल्या खेळीच्या जोरावर केकेआरने आरसीबीसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 5 बॉलआधी 6 विकेट्स राखून सहज पूर्ण केलं. आरसीबीने 19.1 ओव्हरमध्ये 194 धावा केल्या. आरसीबीने अशाप्रकारे 2 गुणांची कमाई केली. आरसीबीचा हा आठवा तर केकेआर विरुद्धचा पहिला विजय ठरला. आरसीबीने विजयासह प्लेऑफचा दावा आणखी मजबूत केला आहे.

आरसीबीची बॅटिंग

विराट कोहली आणि जेकब बेथेल या सलामी जोडीने विजयी धावांचा पाठलाग करताना संयमी सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 20 बॉलमध्ये 37 रन्स जोडल्या. जेकबच्या रुपात आरसीबीने पहिली विकेट गमावली. जेकबने 15 रन्स केल्या. त्यानंतर विराट आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी निर्णायक पार्टनरशीप करुन आरसीबीचा विजय निश्चित केला.

विराट आणि देवदत्तने 59 चेंडूत 92 धावांची भागीदारी केली. देवदत्तला अर्धशतकाची संधी होती. मात्र कार्तिक त्यागीने देवदत्तला कॅप्टन अजिंक्य रहाणे याच्या हाती कॅच आऊट केलं. देवदत्तने 39 धावा केल्या. त्यानंतर विराटने तिघांसोबत धावा जोडून आरसीबीला विजयी केलं.

विराटची नाबाद शतकी खेळी

कॅप्टन रजत पाटीदार याने 11 आणि टीम डेव्हिड याने 2 धावा केल्या. तर विराट आणि जितेश शर्मा हे दोघे आरसीबीला विजयी करुन नाबाद परतले. जितेशने 8 धावा जोडल्या. तर विराटने सर्वाधिक धावा केल्या. विराटने 60 बॉलमध्ये 175 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 105 रन्स केल्या. विराटने या खेळीत 3 षटकार आणि 11 चौकार लगावले. केकेआरसाठी कार्तिक त्यागी याने 3 विकेट्स मिळवल्या. तर सुनील नारायण याने 1 विकेट मिळवली.

स्कोअरकार्ड

केकेआरची बॅटिंग

आरसीबीने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी बोलावलं. केकेआरसाठी टॉप 5 फलंदाजानी योगदान दिलं. त्यामुळे केकेआरला 4 विकेट्स गमावून 192 धावांपर्यंत पोहचता आलं. केकेआरसाठी अंगकृष रघुवंशी याने सर्वाधिक धावा केल्या. अंगकृषने 71 धावा केल्या. कॅप्टन अजिंक्य रहाणे याने 19 तर फिन एलन याने 18 धावा जोडल्या. कॅमरुन ग्रीन याने 32 धावा जोडल्या. तर रिंकू सिंह याने अखेरच्या क्षणी नाबाद 49 धावांची खेळी केली. तर आरसीबीसीठी रसीख सलाम डार, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा