RCB vs KKR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं केकेआरसमोर 183 धावांचं आव्हान

आयपीएल 2024 स्पर्धेतील दहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोलकात्याच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

RCB vs KKR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं केकेआरसमोर 183 धावांचं आव्हान
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 9:12 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुची सुरुवात धीमी राहिली आहे. फाफ डु प्लेसिसच्या रुपाने पहिला धक्का बसला. बंगळुरुचा संघ बॅकफूटवर असताना किंग विराट कोहलीने डाव सावरला आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. संघाच्या 17 धावा असताना फाफ डु प्लेसिस 8 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कॅमरून ग्रीन वर फलंदाजीसाठी उतरला. ग्रीन आणि विराट कोहलीने मिळून दुसऱ्या गड्यासाठी 59 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विराट आणि ग्लेन मॅक्सवेलची जोडी जमली. दोघांनी मिळून संघाच्या धावसंख्येत 40 धावांची भर घातली. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर फटका मारला पण रिंकू सिंह त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला.

विराट कोहलीने 59 चेंडूत नाबाद 83 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले. तर शेवटी दिनेश कार्तिकने 3 षटकार मारत 8 चेंडूत 20 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने सर्वात चांगलं षटक टाकलं. त्याच्या गोलंदाजीमुळे आरसीबीचा धावांचा वेग खऱ्या अर्थाने मंदावला. पण 24 कोटी खर्च करून घेतलेला मिचेल स्टार्क या सामन्यातही फेल ठरला. या सामन्यातही त्याला विकेट घेता आली नाही. हार्षित राणाने 2, आंद्रे रसेलने2 आणि सुनिल नरेनने एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.