
सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या 17 व्या मोसमात इतिहास रचला आहे. हैदराबादने आयपीएलमध्ये सर्वोच्च धावसंख्या केली आहे. हैदराबादने 30 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक करत तुफानी बॅटिंगसह 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 287 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता आरसीबीला विजयासाठी 288 धावांचं आव्हान मिळालं आहे. हैदराबादने याआधी याच हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध 3 विकेट्स गमावून 277 धावा केल्या होत्या. आरसीबी गोलंदाजांनी हैदराबाद विरुद्ध 287 धावा लुटवत सर्वाधिक धावा देण्याचा मुंबईच्या नावावर असलेला नकोस विक्रम आपल्या नावे केला. हैदराबादच्या फलंदाजांनी या डावात एकूण विक्रमी 22 सिक्सही ठोकले.
आरसीबीकडून ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने 41 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 9 चौकारासंह 248.78 च्या स्ट्राईक रेटने 102 धावा केल्या. अभिषेक शर्मा याने 22 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 34 धावा केल्या. हेन्रिक क्लासेन याने 31 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 2 फोरसह 67 धावा ठोकल्या. तर एडन मारक्रम आणि अब्दुल समद या दोघांनी फिनिशिंग टच दिला. एडनने 17 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नाबाद 32 धावा केल्या. तर समदने 10 बॉलमध्ये 4 फोर आणि 3 सिक्ससह नॉट आऊट 37 रन्स केल्या.
तर आरसीबीकडून एकूण 6 गोलंदाजांनी बॉलिंग केली. हैदराबादच्या या प्रत्येक गोलंदाजांनी आरसीबीच्या 6 बॉलर्सना फोडून काढला. लोमरुर आणि विल जॅक्स या दोघांचा अपवाद वगळता इतर चौघांनी 50 प्लस धावा दिल्या. लॉकी फर्ग्यूसन याने 2 आणि रीसो टोपली याने 1 विकेट घेतली.
सनरायजर्स हैजराबादने इतिहास रचला
🚨 𝗧𝗵𝗲 𝗥𝗲𝗰𝗼𝗿𝗱 𝗶𝘀 𝗯𝗿𝗼𝗸𝗲𝗻 𝗮𝗴𝗮𝗶𝗻 🚨@SunRisers continue to hold the record for the highest total in IPL history 🧡🔥
2⃣8⃣7⃣/3⃣#TATAIPL | #RCBvSRH pic.twitter.com/5VOG8PGB6X
— IndianPremierLeague (@IPL) April 15, 2024
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, सौरव चौहान, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, विजयकुमार विशक, रीस टोपले, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.