
ऋषभ पंत हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव… त्याचं संघात असणं म्हणजे सामन्याचं चित्र कधीही पालटू शकतो. आतापर्यंत अनेक सामन्यात असं पाहायला मिळालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात तर त्याने दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. त्यानंतरही त्याचा फॉर्म कायम होता. पण चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याच्या बोटाला चेंडू लागला आणि फ्रॅक्चर झालं. त्यामुळे त्याला बेंचवर बसण्याची वेळ आहे. अशा स्थितीतही त्याने पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या डावात फलंदाजीची वेळ आली नाही. पाचव्या कसोटीत दुखापतीमुळे आऊट झाला. आता त्याला सहा आठवड्यांचा आराम करावा लागणार आहे. त्यामुळे आशिया कप 2025 स्पर्धेला मुकावं लागणार आहे. अशा स्थितीत ऋषभ पंतची सोशल मिडिया पोस्ट चर्चेत आहे. त्याने आपल्या दुखापतीची अपडेट दिली आहे.
ऋषभ पंतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात त्याने त्याचा फ्रॅक्चर झालेल्या पायाचा फोटो टाकला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘मला हे अजिबात आवडत नाही.’ ऋषभ पंतच्या पोस्टमधूनच स्पष्ट कळतं की तो या दुखापतीमुळे वैतागला आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर व्यक्त झाला आहे. आता ऋषभ पंत मैदानात कधी उतरेल याची उत्सुकता आहे. खऱं तर त्याला सहा आठवडे आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. पण इंग्लंड दौऱ्यानंतर तीन आठवड्याचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे तीन आठवड्यांचा अवधी शिल्लक आहे. जर या काळात बरा झाला नाही तर आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.
Get well soon, Rishabh Pant! 🙏❤️ pic.twitter.com/NEZuuB5Rai
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 13, 2025
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत उपकर्णधारपदाची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर होती. त्याने चार सामन्यात 68.42 च्या सरासरीने 479 धावा केल्या. यात त्याने 2 शतकं आणि 3 अर्धशतकं ठोकली. या मालिकेत त्याची सर्वोच्च धावसंख्या ही 134 होती. ऋषभ पंतचा फॉर्म पाहता त्याने या मालिकेत आरामात 500 धावांचा टप्पा ओलांडला असता. पण दुखापत झाली आणि त्याचं पुढचं खेळणं झालंच नाही. तसं पाहीलं तर वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणं देखील कठीण आहे.