AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा निर्णय! दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार

दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना संपताच वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत दक्षिण अफ्रिका वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे.

मोठा निर्णय! दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार
मोठा निर्णय! दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 20, 2025 | 3:42 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही महिन्यात दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंना आत बाहेर राहावं लागत आहे. असं असताना टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला. कर्णधार शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत होता. पण आता तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही हे याबाबत संभ्रम आहे. शुबमन गिलबाबतचे अपडेट 21 नोव्हेंबरला दिले जाणार आहेत. त्यामुळे ऋषभ पंतकडे संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. आता ऋषभ पंतला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे. कारण शुबमन गिल पूर्णपणे दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याचं वनडे मालिकेत खेळणं कठीण आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शुबमन गिलकडे कर्णधारपद सोपवलं होतं. मात्र दुसऱ्याच मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने नव्या कर्णधाराची गरज भासरी आहे.

रेव्हस्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, शुबमन गिल अजूनही फिट नाही. जर त्याला गुवाहाटी कसोटीत खेळवण्यााचा निर्णय घेतला गेला असता आणि त्यात काही झालं असतं तर स्थिती अजून खराब झाली असती. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते मानेच्या दुखापतीतून सावरण्यासाठी पाच ते सात दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे शुबमन गिल खेळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण खेळला नाही तर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. कारण सलग सामने खेळत असल्याने दुखापतग्रस्त होत असल्याचं क्रीडातज्ज्ञांचं म्हणणं आहे.

वनडे मालिकेची धुरा आपसूक ऋषभ पंतकडे येण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत उपकर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे ऋषभ पंतच संघाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केएल राहुल देखील वनडे कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. गिल वनडे मालिकेपूर्वी बरा होईल की नाही? वनडे मालिका खेळणार का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...