Rishabh Pant : ऋषभ पंत याच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, आली बेघर होण्याची वेळ!

| Updated on: May 01, 2023 | 9:42 PM

Sonnet Cricket Club : बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला आहे. अशातच एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे पंत दु:खी झाला असून त्याने सोशल मीडियावर एक भावनिक आवाहन केलं आहे.

Rishabh Pant : ऋषभ पंत याच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, आली बेघर होण्याची वेळ!
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत अपघात झाल्यामुळे गेले चार महिने क्रिकेटपासून दूर आहे. कार अपघातात तो गंभीर जखमी झाला होता मात्र हळूहळू त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला आहे. अशातच एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे पंत दु:खी झाला असून त्याने सोशल मीडियावर एक भावनिक आवाहन केलं आहे.

नेमकं काय झालंय?

ऋषभ पंतने दिल्लीच्या सॉनेट क्रिकेट क्लबकडून या खेळातील बारकावे शिकले आहेत. पंतचे प्रशिक्षक तारक सिन्हा यांची ही अकादमी आता दिल्लीच्या व्यंकटेश्वर कॉलेजमधून काढली जात आहे. क्लबला मिळालेल्या नोटीसबद्दल माहिती देताना पंतने ट्विट केलं आहे.

माझ्या क्लबची अशी अवस्था पाहून खूप वाईट वाटत आहे. या क्लबमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडले आहेत. त्याच सॉनेट क्लबमधून आता वगळणं निराशाजनक आहे. या क्लबमध्ये माझ्यासारखे अनेक खेळाडू घडवले असूम ते सर्वांसाठी घरासारखं असल्याचं ऋषभ पंत म्हणाला.

 

आम्ही नेहमीच कॉलेजने बनवलेल्या नियमांचे पालन केलं आहे. मी व्यंकटेश्वर कॉलेजच्या प्रशासकीय मंडळांना या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करत आहे. कारण सॉनेट क्लब हा केवळ एक क्लब नसून ती एक वारसा संस्था आणि अनेक नवोदित क्रिकेटपटूंचे घर आहे, असंही पंतने सांगितलं आहे.

सॉनेट क्रिकेट क्लब हा दिल्लीच्या जुन्या आणि प्रतिष्ठित क्लबपैकी एक आहे. ऋषभ पंतशिवाय या क्लबमधून संजीव शर्मा, आकाश चोप्रा, रणधीर सिंग, रमन लांबा, मनोज प्रभाकर, अजय शर्मा, अंजुम चोप्रा, सुरेंद्र खन्ना आणि अतुल वासन सारखे मोठे क्रिकेटपटू घडले आहेत.