Cricket : वानखेडे मैदानाबाहेर पाणीपुरी विकणाऱ्या पोराने त्याच मैदानावर ठोकलं शतक, क्रिकेट वर्तुळात चर्चा

या दमदार खेळीची सर्व क्रीडा वर्तुळात चर्चा असून दिग्गज खेळाडू त्याच्यावर कौतुकाची करताना दिसत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशस्वीने वानखेडे मैदानाबाहेर पाणीपुरीचा ठेला लावायचा, त्याच मैदानावर यशस्वीने शतक केल्याने या तरण्या पोराचं सर्वांना कौतुक आहे. 

Cricket : वानखेडे मैदानाबाहेर पाणीपुरी विकणाऱ्या पोराने त्याच मैदानावर ठोकलं शतक, क्रिकेट वर्तुळात चर्चा
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 7:08 PM

मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात 23 वर्षाच्या युवा खेळाडूने जबरदस्त शतक ठोकलं. यशस्वी जयस्वाल याने मुंबईविरूद्ध 124  धावांची शतकी खेळी केली. या दमदार खेळीची सर्व क्रीडा वर्तुळात चर्चा असून दिग्गज खेळाडू त्याच कौतुक करत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाच शतकवीर यशस्वी जयस्वाल वानखेडे मैदानाबाहेर पाणीपुरीचा ठेला लावायचा, त्याच मैदानावर शतक केल्याने या तरण्या पोराची जोरदार चर्चा आहे.

लहाणपणी याच मैदानावर यशस्वाने क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. खेळताना चौकार षटकार मारत संध्याकाळी आपल्या पाणीपुरीच्या ठेल्यावर जायचा. त्यानंंतर त्याचेच मित्र त्याच्याकडे पाणीपुरी खायला जायचे. 2013 मध्ये एके दिवशी आझाद मैदानावर सराव सुरू असताना प्रशिक्षक ज्वाला सिंग यांची नजर त्याच्यावर पडली. येथूनच या युवा खेळाडूचे दिवस बदलू लागले. जून 2018 मध्ये यशस्वीला श्रीलंकेविरुद्ध अंडर-19 संघात स्थान मिळालं होतं.

यशस्वीने 62 बॉलमध्ये 124 धावांची धुंवाधार खेळी केली आहे. मुंबईच्या एकाही बॉलरला त्याने सोडलं नाही. जोफ्रा आर्चर यालाही त्याने कडक सिक्सर मारत पिसलं. यशस्वीच्या शतकाच्या जोरावर राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना 213 धावांचं लक्ष्य मुंबई इंडिअन्ससमोर ठेवलं होतं. याआधी सनरायझर्स हैदराबादसाठी हॅरी ब्रूक आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या व्यंकटेश अय्यर या दोघांनी शतके केली आहेत.

यशस्वी जयस्वाल याने शतक केलं मात्र संघाला विजय काही मिळवता आला नाही. राजस्थान रॉयल्सचं 213 धावांचं लक्ष्य दिलं होतं, मुंबईने 6 गडी राखून विजय मिळवला. आयपीएलच्या 1000 व्या सामन्यात मुंबईने रॉयल्सवर विजय मिळवला.

दरम्यान,आयपीएल 2020 च्या लिलावात यशस्वीला राजस्थान रॉयल्सने 2.4 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याने 2020 मध्ये राजस्थानसाठी तीन सामन्यांत 40 धावा केल्या. यानंतर 2021 मध्ये त्याने 10 सामन्यात 249 धावा केल्या. 2022 च्या लिलावापूर्वी, यशस्वीला राजस्थानने 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. युवा खेळाडूसाठी ही मोठी गोष्ट होती. IPL 2022 मध्ये त्याने 10 सामन्यांमध्ये 258 धावा केल्या.

Non Stop LIVE Update
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.