Riyan Parag : 6 सिक्स आणि 7 फोर, रियान परागचा ‘हल्ला बोल’, दिल्लीच्या गोलंदाजांना चोपलं

| Updated on: Mar 28, 2024 | 10:08 PM

Riyan Parag IPL 2024 : रियान पराग याने राजस्थान रॉयल्ससाठी खऱ्या अर्थाने रॉयल खेळी करत दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली. रियानने 84 धावांची नाबाद खेळी केली.

Riyan Parag : 6 सिक्स आणि 7 फोर, रियान परागचा हल्ला बोल, दिल्लीच्या गोलंदाजांना चोपलं
riyan parag ipl 2024
Image Credit source: BCCI
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या हंगामातील नवव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिट्ल्ससमोर विजयासाठी 186 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 20 ओव्हरमध्ये 185 धावा केल्या. राजस्थानच्या रियान पराग याने नाबाद सर्वाधिक 84 धावांची विस्फोटक खेळी केली. रियानने या खेळीसह आपल्या टीकाकारांना क्षमता दाखवून दिली. रियानने या खेळीत मैदानात चौफेर फटकेबाजी करत दिल्लीच्या गोलंदाजांना झोडून काढला. रियानने केलेल्या 84 धावांच्या जोरावरच राजस्थानला 185 पर्यंत मजल मारता आली.

रियानने 45 बॉलमध्ये 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 186.67 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 84 धावा केल्या. तसेच रियानने अखेरच्या 20 व्या ओव्हरमध्ये तब्बल एकूण 25 धावा झोडल्या. रियानने दिल्लीच्या एनरिच नॉर्तजे याला झोडून काढला. रियानने 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने एकूण 13 बॉलमध्ये 64 धावा केल्या. रियानने इतकंच नाही, तर राजस्थानसाठी चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या विकेटच्या पार्टनरशीपमध्ये मोठं योगदान दिलं.

रियान आणि आर अश्विन याच्यासह चौथ्या विकेटसाठी 39 बॉलमध्ये 54 धावांची भागीदारी केली. रियानचं या भागीदारीत 22 धावांचं योगदान होतं. पाचव्या विकेटसाठी रियान आणि ध्रुव जुरेल दोघांमध्ये 23 बॉलमध्ये 52 धावांची भागीदारी झाली. रियानने या भागीदारीत 11 बॉलमध्ये 32 धावा कुटल्या. तर सहाव्या विकेट्ससाठी 17 बॉलमध्ये शिमरॉन हेटमायरसह 17 चेंडूत 43 रन्स केल्या. रियानचं यामध्ये 9 बॉलमध्ये 23 धावा जोडल्या.

रियान पराग याचं तिसरं आयपीएल अर्धशतक

दरम्यान रियान पराग याचं हे आयपीएलमधील एकूण तिसरं आणि या हंगामातील पहिलं अर्धशतक ठरलं. रियानने 34 बॉलमध्ये सिक्ससह अर्धशतक पूर्ण केलं. रियानच्या अर्धशतकी खेळीत 4 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता.

रियान परागचा वन मॅन आर्मी शो

दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर ), डेव्हीड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

राजस्थान रॉयल्स प्लेईंग इलेव्हन : संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि आवेश खान.