RCB vs RR: रियान परागचा ‘सुपर-थ्रो’, विराट कोहली बाद, पाहा VIDEO

| Updated on: Sep 30, 2021 | 12:30 AM

राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात बुधवारी (29 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात आऱसीबीने राजस्थान संघावर 7 विकेट्सने विजय मिळवला. यासोबतच त्यांनी प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं.

RCB vs RR: रियान परागचा सुपर-थ्रो, विराट कोहली बाद, पाहा VIDEO
रियानने सुपर-थ्रो करत विराटला बाद केलं
Follow us on

IPL 2021: यंदाच्या आयपीएलमधील 43 वा सामना  विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) संघाने राजस्थान रॉयल्स संघाला 7 विकेट्सनी मात देत खिशात घातला. या सामन्यात विराटच्या टोळीने आधी उत्कृष्ट गोलंदाजी आणि नंतर उत्तम फलंदाजीचं प्रदर्शन घडवलं. पण सामन्यात क्षेत्ररक्षणात मात्र राजस्थान रॉयल्स संघानं बाजी मारली. यामध्ये रियान परागने विराट कोहीलीची विकेट घेण्यासाठी केलेली डिरेक्ट हीट आणि मुस्तफिजूर रेहमानने षटकार जाण्यापासून रोखण्याकरता केलेलं अप्रतिम क्षेत्ररक्षण या दोन घटनांनी सर्वांचीच मनं जिकंली.

सामन्यात आधी नाणेफेक जिंकत विराटने गोलंदाजी घेतली. आपल्या या निर्णयाला पूर्णपणे बरोबर सिद्द करत विराटसेनेने राजस्थान संघाला 149 धावांवर रोखलं. केवळ लुईसच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान किमान आव्हानात्मक धावसंख्या स्कोरबोर्डवर लावू शकली. पण आरसीबीकडून मात्र भरतने 44 आणि मॅक्सवेलने नाबाद 50 धावा ठोकत संघाला सोपा विजय मिळवून दिला. पराभूत झाला असला तरी राजस्थान संघाच्या खेळाडूंनी अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं केलेलं प्रदर्शन सोशल मीडिया व्यापत आहे.

रियानचा थ्रो, कोहली बाद

राजस्थान रॉयल्स संघाने दिलेल्या 150 धावांचे आव्हान पूर्ण करताना आरसीबीचे सलामीवीर विराट आणि देवदत्त यांनी उत्तम सुरुवात केली. पण संघाच्या 48 धावा झाल्या असताना देवदत्त 22 धावा करुन बाद झाला. त्यानंतरही भरत आणि विराटने डाव सांभाळला. पण त्याचवेळी सातव्या षटकात भरत आणि विराटमध्ये धाव घेण्याचा ताळमेळ चुकला आणि रियान परागच्या सुपर थ्रोमुळे विराट 25 धावांवरच धावचीत झाला. परागच्या 20 मीटरहून अधिक अंतरावरुन मारलेल्या या थ्रोचे सर्वांकडून कौतुक होत आहे. आयपीएलने त्यांच्या संकेतस्थळावर हा व्हिडीओ अपलोड केला आहे.

रियानच्या या थ्रोसह बांग्लादेशचा खेळाडू मुस्तफिजूर यानेही एक षटकार रोखताना केलेल्या प्रयत्नाला यश आलं. झेल नसला मिळाला तरी संघासाठी त्याने 5 धावा वाचवल्या. या क्षेत्ररक्षणाचा व्हिडीओही आय़पीएलने त्यांच्या संकेतस्थळावर पोस्ट केला आहे.

हे ही वाचा

भारतीय संघातील वाद वाढले, पुजारा-रहाणेनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूची विराटविरोधात तक्रार!

टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी धोनीला मेन्टॉर का केलं?, BCCI कडून पहिल्यांदाच मोठा खुलासा, विराटला इशारा!

महिला खेळाडूंसाठी हेही आव्हान, अशी चाचणी ज्यात स्त्री असल्याचं सिद्ध करावं लागतं, जाणून घ्या काय आहे ‘जेंडर वेरिफिकेशन’?

(Riyan Parags excellence in the field led to Virat Kohli’s run-out see his direct hit video in RR vs RCB match)