मुंबई: जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा…या एका गाण्यातूनच स्त्रियांना एका जन्मात किती आव्हानांना सामोरं जावं लागतं हे कळतं. विविध जबाबदाऱ्या लीलया पेलणाऱ्या स्त्रिया सध्या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तोडीस तोड कामगिरी करत आहेत. क्रिडा क्षेत्रातही स्त्रिया अजिबात मागे नाहीत. याचेच उदाहरण भारताच्या कन्यांनी नुकत्याच ऑलिम्पिक खेळांमध्ये (Tokyo Olympics) केलेल्या कामगिरीवरुन येते. पण असे सर्व असतानाही महिला क्रीडापटूंना आजही बऱ्याच संकटाना तोंड द्यावे लागते.