IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरताच Rohit Sharma च्या नावावर एक नवीन रेकॉर्ड

IND vs PAK: अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला खेळाडू

IND vs PAK: पाकिस्तान विरुद्ध मैदानात उतरताच Rohit Sharma च्या नावावर एक नवीन रेकॉर्ड
रोहित शर्मा
Image Credit source: social
| Updated on: Oct 23, 2022 | 2:34 PM

मेलबर्न: ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात (MCG) भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup) चा सामना सुरु आहे. दोन्ही टीम्सला हा सलामीचा सामना आहे. या मॅचपासूनच त्यांनी आपल्या वर्ल्ड कप अभियानाला सुरुवात केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन आहे. रोहित पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करतोय. रोहित रविवारी टॉससाठी मैदानात उतरला. त्यावेळी त्याने एक रेकॉर्ड केला.

एक नवीन रेकॉर्ड

हा आयसीसीचा आठवा टी 20 वर्ल्ड कप आहे. 2007 पासून टी 20 वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत रोहित प्रत्येक वर्ल्ड कपमध्ये खेळला आहे. आतपर्यंत सर्वच्या सर्व आठ वर्ल्ड कपमध्ये खेळणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे.

रोहित त्या टीमचा भाग होता

2007 मध्ये टीम इंडियाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. रोहित त्या टीमचा भाग होता. त्यानंतर 2009, 2010, 2012, 2014, 2016, 2021 या दरम्यान टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा झाल्या. रोहित या सर्व वर्ल्ड कपमध्ये होता.

एक खेळाडू रोहितची बरोबरी करु शकतो

आणखी एक खेळाडू आहे, जो सर्वाधिक वर्ल्ड कपमध्ये खेळण्यामध्ये रोहितची बरोबरी करु शकतो. बांग्लादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन. सुपर 12 चा पहिला सामना बांग्लादेशची टीम 24 ऑक्टोबरला नेदरलँडस विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात शाकिब रोहितची बरोबरी करेल.

रोहित आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला धोनीसारखं यश मिळवून देण्याचं प्रयत्न करेल. 15 वर्षापासूनचा वर्ल्ड कप विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल.