IND Vs PAK: पाकिस्तानला रडवण्याआधी Rohit Sharma स्वत: का रडला? VIDEO

IND Vs PAK: ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात भारत आणि पाकिस्तानमध्ये टी 20 वर्ल्ड कपचा सामना सुरु आहे. ही मॅच सुरु होण्याआधी एक दृश्य पहायला मिळालं.

IND Vs PAK: पाकिस्तानला रडवण्याआधी Rohit Sharma स्वत: का रडला? VIDEO
Rohit sharma
Image Credit source: icc twitter
| Updated on: Oct 23, 2022 | 3:03 PM

मेलबर्न: ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात भारत आणि पाकिस्तानमध्ये (IND vs PAK) टी 20 वर्ल्ड कपचा (T20 World Cup) सामना सुरु आहे. ही मॅच सुरु होण्याआधी एक दृश्य पहायला मिळालं, ज्यामुळे फॅन्सही इमोशनल झाले. पाकिस्तान विरुद्ध सामना सुरु होण्याआधी रोहित शर्माचे डोळे पाणावले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) डोळ्यात अश्रू होते. टी 20 वर्ल्ड कपची पहिली मॅच खेळण्याआधी रोहित शर्माला काय झालं? तो इतका भावनिक का झाला?

भावूक होण्यामागे काय कारणं?

रोहित शर्माच भावूक होण्यामागच कारण आहे, भारताचं राष्ट्रगीत. भारतीय राष्ट्रगीताचे शब्द ऐकताच रोहित शर्माच्या डोळ्यात पाणी आलं. राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्माने आपले डोळे बंद केले व भावनांवर नियंत्रण ठेवलं.

कसंबसं स्वत:ला इमोशनल होण्यापासून रोखलं

राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्मा डोळे बंद करुन उभा होता. त्याने आकाशाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे भाव होते. त्याने कसंबसं स्वत:ला इमोशनल होण्यापासून रोखलं. पण अखेरीस रोहितच्या डोळ्यात पाणी दिसलच. रोहित शर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रोहितने जिंकली टॉसची बाजी

पाकिस्तान विरुद्ध मॅचआधी टॉसचा सामना रोहितने जिंकला. मैदान आणि कडिशन्सच्या हिशोबाने ही चांगली बाब आहे. रोहित शर्माने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने या मॅचसाठी संतुलित प्लेइंग 11 निवडली आहे. प्लेइंग 11 मध्ये चहलच्या जागी अश्विनला संधी दिली. हर्षल पटेल बाहेर आहे.