Rohit Sharma याचा श्रीलंका विरुद्ध मोठा कारनामा, सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक

Rohit Sharma India vs Sri Lanka Asia Cup 2023 | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आशिया कप 2023 स्पर्धेत धमाकेदार अर्धशतक ठोकत मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जाणून घ्या.

Rohit Sharma याचा श्रीलंका विरुद्ध मोठा कारनामा, सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक
| Updated on: Sep 13, 2023 | 1:36 AM

कोलंबो | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा-शुबमन गिल या जोडीने नेपाळ, पाकिस्तान आणि आता श्रीलंका विरुद्ध आपला तडाखा कायम ठेवलाय. या दोघांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून देण्याची परंपरा कायम ठेवत श्रीलंकेच्या गोलंदाजांना झोडून काढला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी टीम इंडियासाठी श्रीलंका विरुद्ध याच्यासोबत 11.1 ओव्हरमध्ये 80 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर शुबमन गिल आऊट झाला. शुबमनने 25 बॉलमध्ये 19 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

शुबमन आऊट झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. विराट-रोहित जोडीने टीम इंडियाचा स्कोअरबोर्ड हलता ठेवला. रोहितने या दरम्यान कडक सिक्स ठोकत आशिया कपमधील सलग तिसरं अर्धशतक पू्र्ण केलं. रोहितने अवघ्या 44 बॉलमध्ये 115.91 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. रोहितच्या वनडे कारकीर्दीतील हे 51 वं अर्धशतक ठरलं. रोहितने या अर्धशतकी खेळीत 7 फोर आणि 2 सिक्स ठोकले.

‘हिटमॅन’ रोहित

रोहितचा मोठा रेकॉर्ड

रोहितने अर्धशतकासह आणखी एक रेकॉर्ड केला. रोहितने ओपनर म्हणून वेगवान 8 हजार धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला. रोहितने याबाबतत हाशिम अमला आणि सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड ब्रेक केला. रोहितने फक्त 160 डावांमध्ये 8 हजार एकदिवसीय धावांचा टप्पा पार केला. रोहितनंतर दुसऱ्या स्थानी हाशिम अमला आणि तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. अमलाने 173 आणि सचिनने 179 डावांमध्ये 8 हजार रन्स ओपनर म्हणून पूर्ण केल्यात.

अर्धशतकीय हॅटट्रिक

दरम्यान रोहितने श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकीय हॅटट्रिक पूर्ण केली. रोहितने 4 सप्टेंबर रोजी नेपाळ विरुद्ध साखळी फेरीतील सामन्यात 5 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 74 धावांची खेळी केली. त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध 10 सप्टेंबरला मुख्य दिवशी 49 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोरसह 56 रन्स केल्या. तर आता रोहितने श्रीलंका विरुद्ध 48 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.