AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL | टीम इंडियाने टॉस जिंकला, श्रीलंका विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?

INDIA VS SRI LANKA ASIA CUP 2023 | टीम इंडिया सलग तिसऱ्या दिवशी एकाच स्टेडियममध्ये दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया पाकिस्ताननंतर आता श्रीलंका विरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज आहे.

IND vs SL | टीम इंडियाने टॉस जिंकला, श्रीलंका विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये  कोण?
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Sep 12, 2023 | 2:57 PM
Share

कोलंबो | पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर आता आशिया कप 2023 सुपर 4 मधील सामन्यात टीम इंडियासमोर श्रीलंकेचं आव्हान आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.  टीम इंडियाने या सामन्यात टॉस जिंकला आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. आर प्रेमदासा स्टेडियमची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे टीम इंडियात एक अतिरिक्त फिरकी गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे.

टीम इंडियात एक बदल

श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. मुंबईकर शार्दुल ठाकुर याच्या जागी फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याचा समावेश करण्यात आला आहे. कुलदीपने पाकिस्तान विरुद्ध 11 सप्टेंबरला 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावरुन ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी मदतशीर असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे प्लेईंग ईलेव्हनमध्ये अतिरिक्त गोलंदाज म्हणून अक्षरला संधी देण्यात आली आहे. तर श्रीलंका क्रिकेट टीमने आपल्या त्याच 11 जणांवर विश्वास दाखवला आहे. त्यांनी कोणताही बदल केलेला नाही.

टीम इंडियाने टॉस जिंकला

दरम्यान टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध 11 सप्टेंबर रोजी राखीव दिवशी 228 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडियाच्या नेट रनरेटमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे आता श्रीलंका विरुद्ध विजय मिळवल्यास टीम इंडिया थेट आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत पोहचेल. मात्र श्रीलंका आपल्या घरच्या मैदानात खेळतेय. त्यामुळे टीम इंडियासमोर लंका टायगर्सचं कडवं आव्हान असणार आहे.

श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी