Video : रोहित शर्मा याने ‘द्विशतक’ ठोकत तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव याला शिकवला धडा, काय केलं ते वाचा

IND vs BAN : आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात रोहित शर्मा याने आणखी मैलाचा दगड गाठला आहे. तसेच सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना धडा शिकवला.

Video : रोहित शर्मा याने द्विशतक ठोकत तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव याला शिकवला धडा, काय केलं ते वाचा
रोहित शर्माने पुन्हा द्विशतक ठोकलं! तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बरंच शिकवून गेला Watch Video
| Updated on: Sep 15, 2023 | 6:00 PM

मुंबई : आशिया कप स्पर्धेत रोहित शर्मा चांगलाच फॉर्मात आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर गवसल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आशिया कप स्पर्धेत नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध अर्धशतकं झळकावली. आता फलंदाजीसोबत त्याच्या क्षेत्ररक्षणाचंही कौतुक होत आहे. रोहित शर्मा याने नेपाळ, श्रीलंकेनंतर बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही जबरदस्त फिल्डिंग करत झेल घेतला आहे. मेहदी हसनचा झेल घेत त्याने फिल्डिंगमध्येही एकदम बेस्ट असल्याचं दाखवून दिलं आहे. अक्षर पटेल गोलंदाजी टाकत असताना रोहित शर्मा स्लिपमध्ये उभा होता. मेहदी हसन याने चूक केली आणि बॅटची किनार लागत स्लिपच्या दिशेने गेला. रोहित शर्मा याने कोणतीही चूक न करता झेल घेतला आणि द्विशतक पू्र्ण केलं.

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मानं नेमकं काय केलं?

रोहित शर्मा याने झेल घेण्यापूर्वी याच सामन्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा याने झेल सोडले होते. संघाचं दहावं षटक टाकणाऱ्या शार्दुल ठाकुरने गडी बाद करण्यासाठी जाळं लावलं होतं. झालंही तसंच स्क्वेअर मिडविकेटला तिलकच्या हातात चेंडू गेला पण त्याला झेल घेता आला नाही. त्यानंतर सूर्यकुमार यादव यानेही स्लिपला झेल सोडला. त्यामुळे रोहित शर्मा नाराज झाला होता. पण स्वत: झेल त्यांना धडा शिकवून गेला.

रोहित शर्मा याचं द्विशतक

रोहित शर्मा याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात मेहदी हसन याचा झेल घेतला आणि मैलाचा दगड गाठला आहे. रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 वा झेल घेतला आहे. अशी कामगिरी करणारा पाचवा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षक म्हणून 333 झेल पकडण्याचा विक्रम राहुल द्रविड याच्या नावावर आहे. 3003 झेलसह विराट कोहली दुसऱ्या, 261 झेलसह मोहम्मद अझरुद्धीन तिसऱ्या, 256 झेलसह सचिन तेंडुलकर चौथ्या स्थानी आहे. रोहित शर्मा याच्या फिटनेसबाबत कायमच चर्चा होते. पण असं असूनही तो फिट अँड फाईन आहे. यो यो टेस्टमध्ये त्याने हे करून दाखवलं आहे. स्लिपला उभा असला की हातून झेल सुटणं कठीण आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.