SA vs IND 2nd T20 Rain | 19 व्या ओव्हरनंतर खेळ थांबला, पावसाचा खोडा

SA vs IND 2nd T20I Rain | पहिल्या सामन्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यात पावसाने एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामना थांबवण्यात आलाय.

SA vs IND 2nd T20 Rain | 19 व्या ओव्हरनंतर खेळ थांबला, पावसाचा खोडा
| Updated on: Dec 12, 2023 | 10:43 PM

ग्वेबेऱ्हा | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला टी 20 सामना हा पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या टी 20 सामन्यावरही पावसाचं सावट आहे. मात्र सुदैवाने सामन्याला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाने निराशाजनक सुरुवातीनंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह या दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 19.3 ओव्हरमध्ये 180 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डाव पूर्ण होण्यासाठी अवघे 3 बॉल बाकी होते. तेवढ्यात सामन्यात पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे दुसरा सामना हा पावसामुळे थांबवण्यात आला आहे. त्यामुळे आता सामना पुन्हा कधी सुरु होतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.