AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND : टीम इंडिया टी 20i मालिकेसाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार, पहिला सामना किती वाजता?

South Africa Women vs India Women 1st T20I Live Streaming : वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील पहिला सामना हा शुक्रवारी 17 एप्रिलला होणार आहे. दोन्ही संघांची वनडे वर्ल्ड कप फायनलनंतर आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

SA vs IND : टीम इंडिया टी 20i मालिकेसाठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार, पहिला सामना किती वाजता?
Harmanpreet Kaur SA vs IND Women T20i Series 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 17, 2026 | 2:20 AM
Share

भारतात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु असताना क्रिकेट चाहत्यांना शुक्रवार 17 एप्रिलपासून क्रिकेटचा डबल डोस मिळणार आहे. क्रिकेट चाहत्यांना आयपीएलसह वुमन्स टीम इंडियाच्या टी 20i मालिकेचा थरार अनुभवता येणार आहे. वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 5 टी 20I सामने खेळवणार आहे. टीम इंडिया या टी 20i मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या मालिकेत हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर लॉरा वॉल्वॉर्ड्ट हीच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. उभयसंघातील पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? हे आपण जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना कधी?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना शुक्रवारी 17 एप्रिला खेळवण्यात येणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना कुठे?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना डर्बनमधील किंग्समीड इथे होणार आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स पहिल्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स पहिल्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 9 वाजता टॉस होईल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स पहिला टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

टीम इंडियाच दक्षिण आफ्रिकेवर वरचढ

टी 20i क्रिकेटच्या इतिहासात वुमन्स टीम इंडियाच दक्षिण आफ्रिकेवर वरचढ असल्याचं आकड्यातून स्पष्ट होतं. उभयसंघात आतापर्यंत एकूण 19 टी 20i सामने झाल आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 10 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 6 वेळा विजय मिळवला आहे. तर उभयसंघातील 3 सामन्यांचा निकाल लागला नाही. त्यामुळे आता टीम इंडिया या मालिकेत विजयी सलामी देणार की यजमान अपेक्षित सुरुवात करत खातं उघडणार? यासाठी निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

शेवटच्या मालिकेत कोण जिंकलेलं?

दरम्यान टीम इंडिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात 2024 साली शेवटची टी 20i मालिका खेळवण्यात आली होती. या 3 सामन्यांच्या मालिकेतील एक सामना हा रद्द झाला होता. तर दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला होता. त्यामुळे मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...