AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND : दक्षिण आफ्रिका-भारत टी 20I सीरिजसाठी टीम जाहीर, पहिला सामना केव्हा? कॅप्टन कोण?

South Africa vs India Women T20i Series 2026 : दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया वुमन्स यांच्यातील 5 टी 20i सामने हे 3 स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. एकूण 2 स्टेडियममध्ये 4 सामन्यांचा थरार रंगणार आहे.

SA vs IND : दक्षिण आफ्रिका-भारत टी 20I सीरिजसाठी टीम जाहीर, पहिला सामना केव्हा? कॅप्टन कोण?
White Season Ball
| Updated on: Apr 14, 2026 | 5:42 PM
Share

भारतात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची रंगत पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिकेत 5 सामने खेळणार आहे. टीम इंडियाची महिला ब्रिगेड या सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर (India Women Tour Of South Africa 2026) आहे. या मालिकेला 17 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी कुणाला संधी दिलीय हे जाणून घेऊयात.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सोमवारी 13 एप्रिलला या टी 20I मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेसाठी आगामी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका फार महत्त्वाची असणार आहे.

लॉरा वॉल्डवॉर्ट कॅप्टन

लॉरा वॉल्डवॉर्ट या टी 20I मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर माजी कर्णधार डेन वॅन नीकेर्क हीला दुखापतीमुळे मायदेशातील टी 20I मालिकेला मुकावं लागलं आहे. डेन अजूनही दुखापतीतून पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे डेनला या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. डेनला गेल्या महिन्यात न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेतूनही दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं होतं. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने काही आठवड्यांआधीच टी 20I मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा केली होती. त्यानुसार हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

दरम्यान उभयसंघात 17 ते 27 एप्रिल दरम्यान ही टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेचं वेळापत्रक आपण सविस्तर जाणून घेऊयात.

5 सामने आणि 1 मालिका

पहिला सामना, 17 एप्रिल, डरबन, किंग्समीड.

दुसरा सामना, 19 एप्रिल, डरबन, किंग्समीड.

तिसरा सामना, 22 एप्रिल, वाँडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग.

चौथा सामना, 25 एप्रिल, वाँडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग.

पाचवा सामना, 27 एप्रिल, विलूमोरी पार्क, बेनोनी.

दक्षिण आफ्रिका वुमन्स टी 20i मालिकेसाठी सज्ज

टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I सीरिजसाठी वुमन्स दक्षिण आफ्रिका : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), अनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, अयांडा हलुबी, सिनालो जाफ्ता, अयाबोंगा खाका, सुने लुस, टेबोगो माचेके, एलिज-मारी मार्क्स, नॉनकुलुलेको म्लाबा, कायला रेनेके, तुमी सेखुखुने आणि क्लो ट्रायॉन.

Follow Us
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका