Sachin Tendulkar : BCCI चा अध्यक्ष होणार का? सचिन तेंडुलकर याने दिलेल्या उत्तराने सर्वच झालेत चकित

| Updated on: Mar 17, 2023 | 11:25 PM

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता यावर उत्तर देताना त्याने रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुली यांचं नाव घेत उत्तर दिलं आहे.

Sachin Tendulkar : BCCI चा अध्यक्ष होणार का? सचिन तेंडुलकर याने दिलेल्या उत्तराने सर्वच झालेत चकित
Follow us on

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव म्हणून गणला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सचिनला एका कार्यक्रमात BCCI चा अध्यक्ष होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सचिनने जे काही उत्तर दिलं त्यानंतर हस्याचे कारंजे उडाले. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2023 मध्ये त्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता यावर उत्तर देताना त्याने रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुली यांचं नाव घेत मजेशीर उत्तर दिलं आहे.

मी रॉजर बिन्नी आणि सौरव गांगुलीसारखा वेगवान गोलंदाजी करत नाही. सौरव गांगुली एका दौऱ्यावर 140 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत होता आणि नंतर त्याला पाठीचा त्रास झाला, असं म्हणत सचिन याने हा प्रश्न उपरोधिकपणे फेटाळून लावला. यावेळी सचिनला पिचवरून होणाऱ्या आरोपांबबत विचारण्यात आलं.

कसोटी क्रिकेटच्या खेळपट्ट्यांवरून याआधीही वाद झाले आहेत. तो वाद किती दिवस चालला हे महत्त्वाचं नाही. ती कसोटी किती एंगेजिंग होती हे महत्त्वाचं आहे. कारण कोणत्याही दौऱ्यावर गेल्यावर तिथे फलंदाजी करणे सोपे नसते, असं सचिनने सांगितलं.

सचिनने त्याच्या कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्याने आपल्या कारकिर्दीत एकूण 200 कसोटी सामने खेळले आणि 15921 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याने 51 शतके झळकावली.

वनडेमध्ये 18426 धावा केल्या आणि 49 शतके ठोकली. सचिनच्या एकूण कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 24 वर्षांच्या कारकिर्दीत 664 सामने खेळले असून या कालावधीत त्याने 34357 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे.