साक्षीने पती एमएस धोनीच्या निवृत्तीवर लिहिली खास ह्दयस्पर्शी पोस्ट, मनातलं सगळं लिहिलं
Sakshi dhoni emotional post: आज भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माही म्हणजे महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधीलही त्याची निवृत्ती जाहीर केलीये, त्यानंतर त्याची पत्नी साक्षीनंही माहीच्या Ipl निवृत्तीवर तिच्या मनातल्या सगळ्या भावनांना वाट मोकळी करु दिली.

आंतरराष्ट्रीय किकेटनंतर महेंद्रसिंह धोनीने आता आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वीच रिटेन्शनच्या दिवशी त्याने ही निवृत्ती जाहीर केली. माहीच्या आयपीएलमधील खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याची पत्नी साक्षी धोनीने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने धोनीचा डोंगररांगांकडे पाहत असल्याचा फोटो पोस्ट केलाय. ‘काही अध्याय संपतात, तेव्हाच सुंदर नव्या अध्यायांची सुरुवात होते,’ अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
साक्षीने आपल्या पती धोनीवर वर्षानुवर्षे प्रेम करणाऱ्या आणि त्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचेही आभार मानले. ‘तुमच्या प्रेमासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. नव्या सुरुवातीसाठी, नव्या अनुभवांसाठी आणि आणखी सुंदर आठवणींसाठी,’ असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. धोनी आता चेन्नई सुपर किंग्जसोबत खेळाडू म्हणून नाही, तर मेंटॉरच्या भूमिकेत जोडलेला राहणार आहे.
धोनीच्या निवृत्तीनंतर साक्षीची नेमकी पोस्ट काय?
धोनीच्या निवृत्तीच्या संदर्भात साक्षीने लिहिलंय की, ‘काही अध्याय संपतात, तेव्हाच नवीन सुंदर अध्यायांची सुरुवात होऊ शकते. ज्यांनी गेल्या अनेक वर्षांत माहीवर प्रेम केले, त्याला पाठिंबा दिला आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, मग आम्ही तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत असो वा नसो, तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या प्रेमाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ राहू. आता नवीन सुरुवात, नवीन साहसे आणि अशा अनेक सुंदर आठवणींकडे वाटचाल करूया. मला नेहमीच तुझा खूप अभिमान वाटतो, माही.’
दरम्यान, धोनीने आयपीएलमध्ये 278 सामने खेळून 5339 धावा केल्या. त्याची संपूर्ण कारकीर्दीतील सरासरी 38.30 राहिली. धोनीच्या नावावर 24 अर्धशतकं आणि 264 सिक्सर आहेत. धोनीच्या चाहत्यांनीही त्याच्या निवृत्तीवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना धोनीला यंदा खेळताना पाहण्याची इच्छा होती, पण त्यापूर्वीच धोनीने ही बातमी शेअर केली आहे. त्यामुळे आता धोनी जरी मैदानात खेळताना दिसणार नसला तरी तो मेंटॉर म्हणून सीएसकेसाठी कायम उपलब्ध असणार आहे.