मानलं राव! संजय मांजरेकरची प्रीमियम डील, पाचपट भावात विकला प्लॉट, इतके कोटी मिळाले…

संजय मांजरेकर यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे आपली 8,050 चौ.मी. जमीन 22.40 कोटी रुपयांना कारट्रेड टेक लिमिटेडला विकली आहे. या गैर-कृषी जमिनीची सरकारी किंमत 3.01 कोटी असताना, त्यांना पाचपट अधिक रक्कम मिळाली. हा एक मोठा प्रीमियम रिअल इस्टेट व्यवहार असून, भविष्यातील कोणत्याही कायदेशीर वादविवादाची जबाबदारी मांजरेकरांवरच राहील अशी अट आहे.

मानलं राव! संजय मांजरेकरची प्रीमियम डील, पाचपट भावात विकला प्लॉट, इतके कोटी मिळाले...
sanjay manjrekar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2026 | 7:32 PM

भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू आणि प्रसिद्ध कमेंटेटर संजय मांजरेकरने मोठी डील केली आहे. संजयने रायगड जिल्ह्यातील आपली जमीन विकली आहे. संजय मांजरेकरने रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील ढोकवाडे गावातील 8,050 चौ.मी. (सुमारे 86,649 चौरस फूट) नॉन अॅग्रीकल्चरल जमीन विकली आहे. या प्रीमियम डीलमधून त्याला सुमारे 22.40 कोटी रुपये मिळाले आहेत. कारट्रेड टेक लिमिटेडने ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स फर्म CRE Matrix च्या मते ही डील 27 ऑक्टोबर 2026 मध्ये रजिस्टर केली गेली आहे.

संजय मांजरेकरची ही प्रॉपर्टी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ढोकवाडे येथे आहे. ही संपूर्ण जमीन 8,050 चौ.मी. एवढी म्हणजे 86,649.48 चौरस फूट एवढी आहे. या जमिनीवर दोन रेसिडेन्शियल स्ट्रक्चरही आहेत.

Loading...

22.40 कोटींचा व्यवहार

ही संपूर्ण जमीन कारट्रेड टेक लिमिटेडने 22.40 कोटी रुपये कन्सिडरेशन व्हॅल्यूमध्ये खरेदी केली आहे.

22.40 कोटींच्या व्यवहारासाठी कारट्रेडने 1,34,40,000 रूपये (1.34 कोटी रुपये) स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपये रजिस्ट्रेशन शुल्क अदा केलं आहे.

संजय मांजरेकर यांनी 4 फेब्रुवारी 2003 रोजी ही जमीन खरेदी केली होती.

सरकारी व्हॅल्यू 3.01 कोटी

प्रॉपर्टी डॉक्यूमेंट्सनुसार, ग्रामीण भागातील खुल्या गैर कृषी भूमीची सरकारी व्हॅल्यूएशनच्या अंतर्गत या 86,649.48 चौरस फूट जमिनीची मार्केट व्हॅल्यू 3,750 रुपये प्रति वर्ग मीटर आहे.

1% TDS कापला

या आधारे संपूर्ण जमिनीचे सरकारी व्हॅल्यूएशन 3,01,87,500 रुपये (3.01 कोटी रुपये) काढण्यात आलं आहे. मात्र या व्यवहाराची वास्तविक किंमत 22.40 कोटी रुपये आहे.

या एवढ्या मोठ्या डीलमध्ये 22,40,000 रुपये (22.40 लाख रुपये)चं TDS कापलं गेलं आहे, तो एकूण व्यवहाराच्या फक्त 1 टक्के आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जमिनीशी निगडीत कोणतेही वाद, कर्ज आणि देणेदारी नाहीये.

एक अट

रजिस्टर्ड सेल डीडच्या मते, या प्रॉपर्टीवर कोणत्याही बँकेचे कोणतेही कर्ज नाही. कोणताही इन्कम टॅक्स थकलेला नाही. किंवा कोणत्याही ऑथेरिटीचे काही देणे नाहीये, अशी घोषणा संजय मांजरेकर यांनी केली आहे. या व्यवहारात एक अट घालण्यात आली आहे. त्यानुसार, भविष्यात या प्रॉपर्टीच्या मालकी हक्काबाबत कोणताही कायदेशीर वाद, दावा किंवा इन्कम टॅक्सचा वाद निर्माण झाला तर त्याची संपूर्ण आर्थिक आणि कायदेशीर जबाबदारी संजय मांजरेकर यांची असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us