Sanju Samson: बडे दिलवाला, टीममध्ये संधी मिळाली नाही, पण बघा संजूने मैदानात काय केलं ते? VIDEO

| Updated on: Nov 27, 2022 | 2:54 PM

Sanju Samson: चांगली कामगिरी करुनही टीममध्ये संधी मिळाली नाही, म्हणून संजू हताश, निराश होऊन बसला नाही, तर त्याने....

Sanju Samson: बडे दिलवाला, टीममध्ये संधी मिळाली नाही, पण बघा संजूने मैदानात काय केलं ते? VIDEO
Yuzi-sanju
Image Credit source: AFP
Follow us on

हॅमिल्टन: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये आज हॅमिल्टनच्या मैदानात दुसरा वनडे सामना खेळला गेला. पण पावसाने या सामन्यात व्यत्यय आणला. सामना सुरु झाला होता, तितक्यात पाऊस सुरु झाला. पावसामुळे काही तासांचा खेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर मॅच पुन्हा सुरु झाली. अंपायर्सनी 29 ओव्हर्सचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला.

ग्राऊंड स्टाफची मदत

पण पुन्हा पाऊस सुरु झाला. त्यानंतर अंपायर्सनी मॅच रद्द करण्याचा निर्णय घेतला. या मॅच दरम्यान टीम इंडियाचा एका फलंदाज हॅमिल्टनच्या मैदानात ग्राऊंड स्टाफची मदत करताना दिसला. हा फलंदाज दुसरा, तिसरा कोणी नसून टीममधून ड्रॉप केलेला संजू सॅमसन आहे.

त्यावेळी स्थिती काय होती?

29 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला. मॅच सुरु झाली होती, इतक्यात पाऊस आला. मॅच पुन्हा थांबवावी लागली. दुसऱ्यांदा मॅच थांबवावी लागली, तेव्हा टीम इंडियाचा स्कोर 12.5 षटकात एक विकेट गमावून 89 धावा झाल्या होत्या. सूर्यकुमार यादव 34 आणि शुभमन गिल 45 धावांवर खेळत होते.

संजूचा मोठेपणा

पावसामुळे ग्राऊंड स्टाफला खेळपट्टीवर कव्हर्स घालताना अडचणी येत होत्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कव्हर्स संभाळताना ग्राऊंड स्टाफला अडचणींचा सामना करावा लागत होता. अशावेळी संजू सॅमसन ग्राऊंडच्या स्टाफच्या मदतीसाठी पुढे आला.

संजू राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन

संजू आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो. तो या टीमचा कॅप्टन आहे. फ्रेंचायजीने संजूचा एक व्हिडिओ टि्वट केलाय. संजूच्या नेतृत्वाखाली यावर्षी राजस्थानची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली होती. पण फायनलमध्ये गुजरात टायटन्सने त्यांना नमवलं.

सोशल मीडियावर संताप

आजच्या मॅचमध्ये संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. त्यावरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला. क्रिकेटच्या जाणकारांनी या निर्णयावर टीका केली आहे. संजूने पहिल्या ऑकलंड वनडेमध्ये चांगली कामगिरी केली होती, तरी त्याला दुसऱ्या वनडेत संधी मिळाली नाही.