टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनचा अपमान! नेट प्रॅक्टिस दरम्यान झालं असं काही..

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनच्या फलंदाजीला ग्रहण लागलं. आधी संघात स्थान मिळत नव्हतं. त्यानंतर प्लेइंग 11 मधून डावललं आणि आता प्लेइंग 11 मधून आऊट झाला. आता कहर म्हणजे नेट प्रॅक्टिसमध्येही संजू सॅमसनसोबत विचित्र प्रकार घडला. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनचा अपमान! नेट प्रॅक्टिस दरम्यान झालं असं काही..
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनचा अपमान! नेट प्रॅक्टिस दरम्यान झालं असं काही..
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 06, 2026 | 9:33 PM

संजू सॅमसन हा क्रिकेटमधील कमनशिबी खेळाडू ठरला आहे. त्याला कारणंही तसंच आहे. संजू सॅमसनने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. पण संजू सॅमसनची जागा काही संघात होत नव्हती. त्यामुळे सोशल मीडियावर रान उठलं होतं. त्यानंतर त्याच्या खेळीची दखल घेतली गेली आणि त्याला संघात स्थान मिळालं. पण संघात नुसतं स्थान मिळून चालत नाही. तर प्लेइंग 11 मध्येही असणं तितकंच गरजेचं होतं. मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असंच काहीसं झालं होतं. पण त्यानंतर संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळत गेलं. त्यात त्याने चांगली फलंदाजी केली आणि निवड समितीचा विश्वास जिंकला. त्या कामगिरीच्या जोरावर त्याला टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या संघात स्थान मिळालं. पण या स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या टी20 मालिकेत त्याची बॅट शांत राहिली. तसेच विकेटकीपर फलंदाज इशान किशनने त्याची प्लेइंग 11 मधील जागा चांगल्या कामगिरीच्या जोरावर खाल्ली. आता नेट प्रॅक्टिसमध्येही त्याला डावललं गेल्याची चर्चा आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी नेट प्रॅक्टिस केली. सर्व फलंदाजांनी जोरदार सराव केला. पण यात संजू सॅमसन कुठेच नव्हता. त्याला संधी दिली गेली नाही. इतकंच गोलंदाज अर्शदीप सिंह, फिरकीपटू कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती यांनाही फलंदाजीचे धडे दिले गेले. त्यांनी धडे गिरवताना जोरदार फटकेबाजी केली. पण संजू सॅमसनला नेट प्रॅक्टिसपासून लांबच ठेवलं गेलं. त्यामुळे संजूचा प्लेइंग 11 साठी विचारच गेला जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे. कारण या सरावाकडे सामन्याची पूर्वतयारी म्हणून पाहिलं जातं. यात खेळाडू आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीला धार चढवतात. त्यामुळे संजूने सराव न केल्याने प्लेइंग11 चा भाग नसेल असं दिसत आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यातही त्याला वगळण्यात आलं होतं. अभिषेक शर्मासोबत फलंदाजीला इशान किशन उतरला होता. इतकंच काय तर विकेटकीपिंगही इशान किशनने केली होती. त्यामुळे संजू सॅमसनला बेंचवरच बसून स्पर्धा पाहावी लागेल असं दिसत आहे. इशान किशन प्लेइंग 11 चा भाग असेल हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे संजू सॅमसन टी20 वर्ल्डकपपूर्वी कमनशिबी ठरला असंच म्हणावं लागेल. फॉर्मात होता तेव्हा संधी नाही. फॉर्मात नसताना संधी मिळाली पण काही करू शकला नाही. त्याचा फटका टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बसणार आहे.