IND vs BAN : 8 चौकार 2 षटकार, संजू सॅमसनचा हैदराबादमध्ये धमाका, बांगलादेश विरुद्ध अर्धशतकी झंझावात

Sanju Samson Fifty: संजू सॅमसनने बांगलादेश विरुद्ध अवघ्या 22 चेंडूत षटकार ठोकत विस्फोटक अर्धशतक झळकावलं आहे.

IND vs BAN : 8 चौकार 2 षटकार, संजू सॅमसनचा हैदराबादमध्ये धमाका, बांगलादेश विरुद्ध अर्धशतकी झंझावात
Sanju samson hitting
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Oct 12, 2024 | 8:01 PM

संजू सॅमसनला बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे संजूवर सडकून टीका करण्यात आली होती. इतकंच काय, तर संजूला तिसऱ्या सामन्यातून वगळण्यात यावं, असंही म्हटलं जात होतं. मात्र संजूला तिसऱ्या सामन्यात सूर गवसला. संजूने हैदराबादमधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात आक्रमक सुरुवात करुन टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. संजूने बांगलादेश विरुद्ध अवघ्या 22 बॉलमध्ये अर्धशतक झळकावत टीम इंडियाला अफलातून सुरुवात करुन दिली आहे. संजूने या खेळीदरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली.

संजूला पहिल्या 2 सामन्यात एकूण 39 धावाच करता आल्या. मात्र त्यानंतर संजूने या अंतिम सामन्यात अभिषेक शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 23 धावांची भागीदारी केली. संजूने या दरम्यान दुसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या 4 चेंडूंमध्ये सलग 4 चौकार ठोकून 16 धावा मिळवल्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर अभिषेक शर्मा आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन सू्र्यकुमार यादव मैदानात आला. सूर्यानेही संजूला अप्रतिम साथ देत बांगलादेशच्या गोलंदाजांची बॅटने बेदम धुलाई केली. संजूने या दरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली. संजू आणि सूर्या या जोडीने टी 20i क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून पावरप्लेमध्ये (6 ओव्हर) सर्वाधिक धावा 82 धावा केल्या.

संजूने त्यानंतर सातव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर षटकार ठोकून अर्धशतक झळकावलं. संजूने अवघ्या 22 बॉलमध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 231.82 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं.

संजूचं विस्फोटक अर्धशतक

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.