
स्कॉटलँड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलिया या मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली. ट्रेव्हिस हेड हा पहिल्या विजयाचा हिरो ठरला होता. हेडने 25 बॉलमध्ये 80 धावांची विस्फोटक खेळी केली होती. हेडच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजयासाठी मिळालेलं 155 धावांचं आव्हान हे 9.4 ओव्हरमध्येच पूर्ण केलं होतं. त्यानंतर आता उभयसंघात दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. स्कॉटलँडने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यामुळे आता हेड दुसऱ्या सामन्यातही पहिल्या सामन्याचा एक्शन रिप्ले दाखवणार, अशी सर्वांना आशा होती. मात्र सर्व उलटंच झालं.
ऑस्ट्रेलिया विस्फोटक फलंदाज आणि टीम इंडियाचा शत्रू असलेला ट्रेव्हिस हेड याला खातंही उघडता आलं नाही. हेड हा गोल्डन डक झाला. हेड क्लिन बोल्ड झाला. क्रिकेटमध्ये पहिल्याच बॉलवर आऊट झाल्यास ‘गोल्डन डक’असं म्हटलं जातं. हेडसारखा फलंदाज तुलनेत दुबळ्या स्कॉटलँड विरुद्ध झिरोवर आऊट झाल्याने तो ट्रोल होत आहे. स्कॉटलँडकडून ऑस्ट्रेलियाच्या डावातील दुसरी ओव्हर ब्रॅडली करी टाकत होता. ब्रॅडली करी याने टाकलेला चौथा बॉल हेडला समजलाच नाही. हेड त्याच्या डावातील पहिलाच बॉल खेळत होता. ब्रॅडलीने अप्रतिम इनस्विंग टाकला. ब्रॅडलीने टाकलेला बॉल थेट येऊन स्टंपला लागला आणि हेड क्लिन बोल्ड झाला. हेड अशाप्रकारे आऊट झाला.
दरम्यान हेडने पहिल्या टी 20i सामन्यात स्कॉटलँडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत चौफेर फटकेबाजी केली होती. हेडने 155 धावांचा पाठलाग करताना 25 बॉलमध्ये 12 चौकार आणि 5 सिक्स ठोकले होते. हेडच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने विजयी आव्हान हे 9.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं होतं. तसेच ऑस्ट्रेलियाने टी20i क्रिकेटमध्ये पावर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा विश्व विक्रमही केला होता.
ट्रेव्हिस हेड गोल्डन डक
Travis Head Needs To Really Get A Hold Of This Line & Length. Got Out Multiple Times In This Fashion!!!#TravisHead #SRH #IPL2024 pic.twitter.com/J7UICBEy3u
— Varun Velamakanti (@VarunSunRisers) September 6, 2024
स्कॉटलँड प्लेइंग ईलेव्हन : रिची बेरिंग्टन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, चार्ली टीयर (विकेटकीपर), मायकेल लीस्क, मार्क वॅट, ख्रिस ग्रीव्हज, क्रिस्टोफर सोल, ब्रॅड व्हील आणि ब्रॅडली करी.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), आरोन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट आणि ॲडम झाम्पा.