Goa Nightclub Fire: गोल्ड मेडलिस्ट इंजीनिअर बनला नाईट क्लबचा फाऊंडर; कोण आहेत लुथरा ब्रदर्स?
Goa Nightclub Fire: गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांनी आपले प्राण गमावले. या घटनेनंतर क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमधून ताब्यात घेण्यात आलंय. घटनेनंतर लगेचंच दोघं परदेशात फरार झाले.

पर्यटकांची गर्दी आणि झगमगतं नाईटलाइफ ही गोव्याची वैशिष्ट्ये आहेत. डिसेंबरमध्ये असंख्य पर्यटक गोव्याला फिरायला जातात. ऐन पर्यटनाच्या काळात 6 डिसेंबरच्या मध्यरात्री गोव्यात मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवलं होतं. गोव्यातील अर्पोरा इथल्या ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबला अचानक भीषण आग लागली. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. याप्रकरणी गोवा पोलिसांनी क्लबच्या व्यवस्थापकासह चार जणांना अटक केली. या घटनेनंतर सर्वांत मोठा प्रश्न होता की हा क्लब कोणाचा होता आणि त्याचे मालक कुठे आहेत? पोलिसांच्या तपासात आढळून आलं की क्लबचे मालक प्रसिद्ध लुथरा ब्रदर्स असून आगीची घटना घडताच ते ताबडतोब देश सोडून थायलंडला पळून गेले. ...
