
पर्थ: क्रिकेटमध्ये जय-पराजय सुरु असतो. एकदिवस तुम्ही शिखरावर असता, एक दिवस जमिनीवर. हा सर्व खेळाचा भाग आहे. पराभव स्वीकारला पाहिजे असं म्हटलं, तरी पराभव पचवणं सोप नाहीय. पराभव होतो, तेव्हा चाहत्याच, क्रिकेटपटूच मन तुटतं. वेदना होतात. पाकिस्तान क्रिकेटर आणि चाहत्यांची सध्या हीच स्थिती आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
टी 20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्स आतमधून कोसळलेत. त्यांचा उपकर्णधार शादाब खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात तो रडताना दिसतोय.
व्हिडिओ पाहून फॅन्स भावनिक झाले
या व्हिडिओमध्ये शादाब खान पराभवानंतर जमिनीवर बसला. त्याचं तोंड खाली होतं, तो रडत होता. पाकिस्तानी सपोर्ट स्टाफच्या सदस्याने त्याला धीर दिला, संभाळलं. शादाब खानचा हा व्हिडिओ पाहून अनेक पाकिस्तानी फॅन्स भावनिक झालेत. अनेकांनी त्याला अश्रू ढाळण्याऐवजी खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिलाय.
बाबर-नवाजही दु:खी
पाकिस्तानच्या पराभवानंतर कॅप्टन बाबर आजमही निराश झाला. ड्रोसिंग रुममधून त्याने पाकिस्तानला पराभूत होताना पाहिलं. बाबरने हातांनी आपला चेहरा झाकला होता. मोहम्मद नवाज बरोबरही असच काही झालं. 20 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर नवाज आऊट झाला. त्याला यावर विश्वास बसत नव्हता.
LITERALLY TEARS IN MY EYES. JUST CANT SEE THAT??? pic.twitter.com/pTbM39vxFC
— momina ?? (@theobsessedbear) October 28, 2022
माजी क्रिकेटपटूंची पाकिस्तान टीमवर टीका
पाकिस्तानी क्रिकेट टीमला विजयासाठी फक्त 131 धावांच लक्ष्य मिळालं होतं. पण त्यांना हे लक्ष्य पार करता आलं नाही. या पराभवानंतर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू पाकिस्तानी टीमवर टीका करतायत. पाकिस्तानी क्रिकेट संकटात असल्याच शोएब अख्तरने म्हटलय.