सचिन, गांगुलीला सतावणाऱ्या चौकीदाराच्या मुलाच्या आयुष्यावर येतोय चित्रपट

| Updated on: Jul 26, 2022 | 7:21 AM

चित्रपट सृष्टीत सध्या खेळाडूंवर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. कुठल्याना कुठल्या खेळाडूवर चित्रपट येतोय. अलीकडेच भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या (Mithali Raj) जीवनावर चित्रपट रिलीज झाला.

सचिन, गांगुलीला सतावणाऱ्या चौकीदाराच्या मुलाच्या आयुष्यावर येतोय चित्रपट
rawalpindi express
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: चित्रपट सृष्टीत सध्या खेळाडूंवर बायोपिक बनवण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. कुठल्याना कुठल्या खेळाडूवर चित्रपट येतोय. अलीकडेच भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजच्या (Mithali Raj) जीवनावर चित्रपट रिलीज झाला. झुलन गोस्वामी या महिला क्रिकेटपटूच्या जीवनावरही बायोपिक येतोय. त्यात अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुख्य भूमिकेत आहे. सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, मेरीकॉम सारख्या खेळाडूंवर बॉलिवूडमध्ये चित्रपट बनलेत. या भारतीय खेळाडूंच्या लिस्ट मध्ये आता एक पाकिस्तानी खेळाडूच्या नावाचाही समावेश होणार आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (shoaib akhtar) सोशल मीडियाच्या माध्यमातून लवकरच त्याच्या आयुष्यावर आधारित बायोपिक रिलीज होणार असल्याची माहिती दिली.

कधी होणार रिलीज?

शोएब अख्तरने त्याच्या आयुष्यावर बनणाऱ्या बायोपिकची रिलीज डेटही सांगितली आहे. पुढच्यावर्षी 16 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होईल. शोएब अख्तरचं बालपण गरीबीत गेलं. त्याचे वडिल एक ऑईल रिफायनरीत पेट्रोल स्टेशनवर नाइट वॉचमन म्हणून काम करायचे. अशा परिस्थितीत जागतिक क्रिकेट मध्ये नाव कमावण्यासाठी त्याने मोठा संघर्ष केलाय. बायोपिक मध्ये त्याच संघर्षाची गोष्ट आहे.

चित्रपटाचं नाव ‘रावळपिंडी एक्सप्रेस’

शोएब अख्तरच्या आयुष्यावर बनणाऱ्या बायोपिकला मोहम्मद फराज कैसर डायरेक्ट करत आहे. ‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ या चित्रपटाचं नाव आहे. शोएब अख्तर ज्या वेगाने गोलंदाजी करायचा, त्यासाठी त्याला रावळपिंडी एक्स्प्रेस म्हटलं जायचं. चित्रपटाचा मोशन पोस्ट रिलीज करण्यात आलं आहे. यात एक रेल्वे ट्रॅक दाखवण्यात आला आहे. शोएब अख्तरची अशी इच्छा आहे की, त्याचा रोल सलमान खानने करावा. चित्रपटात लीड रोल मध्ये कोण असणार? ते अजून स्पष्ट नाहीय. शोएब अख्तरने भारताविरोधात खेळताना काहीवेळा आपल्या गोलंदाजीने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांना त्रास दिला होता.