AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: ‘माझा रेकॉर्ड मोडण्याच्या नादात हाडं मोडतील’, शोएब अख्तर उमरानच्या वेगाने बिथरला

IPL 2022 मध्ये उमरानने 157 KMPH स्पीडने चेंडू टाकलाय. यापेक्षा जास्त वेगाने फक्त शॉन टेटने चेंडू टाकला होता. ज्याचा स्पीड 157.7 KMPH होता.

IPL 2022: 'माझा रेकॉर्ड मोडण्याच्या नादात हाडं मोडतील', शोएब अख्तर उमरानच्या वेगाने बिथरला
Umran Malik-Shoaib AKthar Image Credit source: PTI/Twitter
| Updated on: May 16, 2022 | 2:53 PM
Share

मुंबई: सध्याच्या घडीला उमरान मलिक (Umran malik) हा क्रिकेट विश्वातला एक वेगवान गोलंदाज आहे. IPL 2022 स्पर्धा आपल्या वेगाने तो गाजवतोय. उमरान मलिकच्या नावाची भरपूर चर्चा आहे. त्याच्या गोलंदाजीचा वेग फलंदाजांना धडकी भरवतोय. अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल होत आहेत. उमरानच्या वेगाची चर्चा फक्त आयपीएल पुरताच मर्यादीत नाहीय, तर शेजारच्या पाकिस्तानातही आता त्याच्या नावाची चर्चा सुरु झालीय. शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) उमरान मलिकच्या वेगवान गोलंदाजीबद्दल भाष्य केलय. उमरानच्या गोलंदाजीचा वेगच इतका आहे, की आता शोएबला त्याचा रेकॉर्ड तुटण्याची भीती सतावत आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड शोएब अख्तरच्या नावावर आहे. प्रत्येक सामन्यानिशी उमरानच्या गोलंदाजीचा वेग जसा वाढत चाललाय, तसा शोएबचा रेकॉर्डसाठी तो धोका बनत चाललाय.

IPL च्या इतिहासातला दुसरा वेगवान चेंडू

उमरान मलिकने या सीजनमध्ये आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याने आधी 154 KMPH स्पीडने चेंडू टाकला. त्यानंतर 155 KMPH स्पीडने बॉल टाकला.

शॉन टेट उमरानच्या पुढे

IPL 2022 मध्ये उमरानने 157 KMPH स्पीडने चेंडू टाकलाय. यापेक्षा जास्त वेगाने फक्त शॉन टेटने चेंडू टाकला होता. ज्याचा स्पीड 157.7 KMPH होता. म्हणजे फक्त पॉइंट 7 चा फरक आहे. पुढच्या सामन्यात उमरानने शॉन टेटला मागे टाकल्यास आश्चर्य वाटणार नाही. पाकिस्तानात असलेल्या शोएब अख्तरला याची जाणीव आहे. त्यामुळेच तो उमरानला चिथावणी देतोय, जेणेकरुन उमरानला दुखापत झाली पाहिजे व त्याचा रेकॉर्ड अबाधित राहिलं.

शोएबचा रेकॉर्ड काय आहे?

शोएब अख्तरच्या नावावर 161.3 KMPH स्पीडने चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. म्हणजे शोएबने उमरानपेक्षा 4.3 KMPH जास्त वेगाने चेंडू टाकलाय.

दुसऱ्याबाजूला मनात भिती पण घालतोय

उमरान तुझा वेगवान चेंडूचा रेकॉर्ड मोडू शकतो का? असा थेट प्रश्न शोएबला विचारण्यात आला. त्यावर त्याने “उमरानने माझा रेकॉर्ड मोडला, तर मला आनंदच होईल. पण माझा रेकॉर्ड मोडण्याच्या नादात त्याने त्याची हाड मोडून घेतली नाही, म्हणजे मिळवलं” शोएब एकाबाजूला उमरानच कौतुक पण करतोय आणि दुसऱ्याबाजूला त्याच्या मनात भिती पण घालतोय. यातून शोएबला त्याच्या रेकॉर्डची चिंता जास्त सतावतेय हे स्पष्ट होतं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.