IND vs PAK: पाकिस्तानला हरवल्यानंतरही Shoaib akhtar ची घमेंड नाही उतरली, म्हणाला….

IND vs PAK: टीम इंडियाकडून झालेला पराभव शोएब अख्तरला पचवता येत नाहीय.

IND vs PAK: पाकिस्तानला हरवल्यानंतरही Shoaib akhtar ची घमेंड नाही उतरली, म्हणाला....
Shoaib-Akthar
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 24, 2022 | 9:45 AM

मेलबर्न: ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड काल प्रेक्षकांनी खच्चून भरलं होतं. 90 हजार क्रिकेटप्रेमी भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची रंगत अनुभवण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. टीम इंडियाने या मॅचमध्ये पाकिस्तानवर चार विकेट राखून विजय मिळवला. विराट कोहली शेवटपर्यंत क्रीजवर होता. टीमला विजयी करुनच तो ड्रेसिंग रुममध्ये परतला.

टीम इंडियाकडून झालेला हा पराभव पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला पचवता येत नाहीय. त्याने थेट भारताला चॅलेंज केलय. भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा सामना होईल. त्या मॅचमध्ये पाकिस्तान भारतावर विजय मिळवेल, असं शोएब म्हणाला.

अख्तर काय म्हणाला?

पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरने युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलाय. यात सामन्याच विश्लेषण आहे. या व्हिडिओत शोएब अख्तरने भारताने आपला विजय वाया घालवू नये, असा एक एक सल्ला दिलाय. “आज हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी भरपूर मुलं आली होती. त्यांनी आज चांगल क्रिकेट पाहिलं. सोशल मीडिया लहान मुल सुद्धा पाहतात. त्यामुळे वाईट गोष्टींसह हा विजय वाया घालवू नका, असं मी हिंदुस्थानला आवाहन करतो” असं शोएबने या व्हिडिओत म्हटलय.

मधली फळी परिपक्वता दाखवू शकली नाही

“पाकिस्तानने चांगली कामगिरी केली. ज्या विकेटवर चेंडू समजत नव्हता, तिथे पाकिस्तानने 160 धावा केल्या. मधली फळी परिपक्वता दाखवू शकली नाही. भारताला या विजयाच्या शुभेच्छा. भारताने या वर्ल्ड कपमध्ये एक मॅच जिंकली आहे, पाकिस्तानने एक सामना गमावलाय. पुन्हा एकदा भारताशी सामना होईल. त्यावेळी आम्ही भारताला हरवू” असं शोएबने म्हटलं.

वर्ल्ड कप आता सुरु झालाय

वर्ल्ड कप आता सुरु झालाय. अख्तरच्या मते भारत-पाकिस्तान सामन्याने वर्ल्ड कप सुरु होतो. “वर्ल्ड कपची शानदार सुरुवात झाली आहे. भारत-पाकिस्तानचा सामना होतो, त्यावेळी क्रिकेट वर्ल्ड कप सुरु होतो. माझ्यासाठी तर आजपासून वर्ल्ड कप सुरु झालाय” असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.