युसूफ पठाणला धक्का दिला, आता मिळाली तगडी शिक्षा

आधी धक्का दिला. त्यानंतर चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळे तोंडावर पडला.

युसूफ पठाणला धक्का दिला, आता मिळाली तगडी शिक्षा
युसूफ पठानला धक्का दिला
Image Credit source: social
| Updated on: Oct 03, 2022 | 9:22 PM

नवी दिल्ली : रविवारी भिलवाडा किंग्ज आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात इंडिया कॅपिटल्सचा (India Capitals) वेगवान गोलंदाज जॉन्सनचा भिलवाडा किंग्जचा (Bhilwara Kings) फलंदाज युसूफ पठाणसोबत (Yusuf Pathan) वाद झाला होता. यानंतर मिचेल जॉन्सनला लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये गैरवर्तन केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. त्याला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

जॉन्सन आणि युसूफ पठाण यांच्यात बाचाबाची झाली. संघातील उर्वरित खेळाडू आणि पंचांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. पठाण फलंदाजी करत असताना जॉन्सननं त्याला काहीतरी सांगितलंय हे ऐकून पठाण चिडला आणि त्याच्या बोलण्याला उत्तर देत पुढे गेला. त्यानंतर जॉन्सनकडे आल्यावर त्यानं पठाणला धक्काबुक्की केली.

समितीने हा निर्णय घेतला

या प्रकरणाची लीगच्या शिस्तपालन समितीनं चौकशी केली होती. त्याचं नेतृत्व भारताचे माजी प्रशिक्षक आणि कर्णधार रवी शास्त्री करत आहेत. या लढतीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर या समितीनं गोलंदाजाला शिक्षा करण्याचा निर्णय घेतला आणि इशाराही दिला.

लीगचे सीईओ रमण रहेजा यांनी एका निवेदनात सांगितलं की, ‘आम्ही येथे क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आलो आहोत. काल मैदानावर जे घडले ते घडायला नको होते. आम्ही हा व्हिडीओ अनेक वेळा पाहिला आणि नंतर काही निष्कर्षापर्यंत पोहोचलो.’

असा सामना होता

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भिलवाडा किंग्जनं 5 विकेट गमावून 226 धावा केल्या. त्यासाठी विल्यम पोर्टफिल्डनं 59 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने 37 चेंडूंचा सामना केला आणि सात चौकारांसह तीन षटकार ठोकले.

शेन वॉटसनने 39 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. युसूफ पठाणने 24 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. राजेश बिश्नोई 11 चेंडूत 36 धावा करून नाबाद राहिला.