IND vs SA 2nd t20 : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, भारताची पहिले बॅटिंग

IND vs SA 2nd t20 : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला असून पहिले भारत बॅटिंग करणार आहे. अधिक जाणून घ्या....

IND vs SA 2nd t20 : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, भारताची पहिले बॅटिंग
दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला
Image Credit source: icc
शुभम कुलकर्णी

|

Oct 02, 2022 | 7:06 PM

नवी दिल्ली :  गुवाहाटीमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या (IND vs SA 2nd t20) सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं (South Africa) नाणेफेक जिंकली असून भारत (Team India) पहिले फलंदाजी करणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं आपल्या संघात बदल केला आहे. लुंगी एनगिडी संघात आलाय. तबरेज शम्सी बाद झालाय. भारतीय संघात कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या सामन्यात ज्या संघानं विजय मिळवला त्याचं संघासोबत रोहित शर्मा आलाय.

आयसीसीचं ट्विट

दुसऱ्या सामन्यात भारताच्या नजरा मालिका जिंकण्यावर असतील. टीम इंडिया या कामात यशस्वी ठरली तर दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत प्रथमच पराभूत करू शकेल. तर दक्षिण आफ्रिकेच्या नजरा या मालिकेत पुनरागमनावर असणार आहे.

दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या…

टीम इंडियाचे प्लेइंग-11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग, दीपक चहर, हर्षल पटेल.

बीसीसीआयचं ट्विट

दक्षिण आफ्रिकेचे 11 खेळाडू

टेम्बा बावुमा (क), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रिले रुसो, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, वेन पेर्नेल, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी, केशव महाराज

बीसीसीआयचं ट्विट

सुनील गावसकर यांनी खेळपट्टीच्या अहवालात म्हटलंय की, ‘खेळपट्टीवरील तडे उघडू शकतात आणि तसे झाल्यास गोलंदाजांना मदत होईल. मोठी धावसंख्या मिळण्याची आशा नाही. फिरकीपटूंना खूप मदत मिळेल.’

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें