Video : लॉर्ड्स कसोटी सामन्यात शुबमन गिल थेट पंचांना भिडला, हातातून चेंडू खेचला आणि…

लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या सत्रात तीन विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. यात नव्या चेंडूची भूमिका महत्त्वाची होती. पण पंचांनी घेतलेल्या निर्णयामुळे शुबमन गिलच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

Video : लॉर्ड्स कसोटी सामन्यात शुबमन गिल थेट पंचांना भिडला, हातातून चेंडू खेचला आणि...
Video : लॉर्ड्स कसोटी सामन्यात शुबमन गिल थेट पंचांना भिडला, हातातून चेंडू खेचला आणि...
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 11, 2025 | 5:02 PM

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा चेंडूवरून वादाला फोडणी मिळाली आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच हा वाद पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल चांगलाच भडकला होता. तसेच पंचांसोबत वादही घातला. फक्त गिलच नाही तर वेगवान गोलंदा मोहम्मद सिराजही पंचांच्या या निर्णयामुळे नाराज दिसला. हे सर्व काही घडलं ते चेंडू बदलण्यावरून.. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताने चांगली सुरुवात केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने खेळ सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच तीन विकेट काढले. यात नव्या चेंडूची भूमिका खूपच महत्त्वाची ठरली. कारण हा चेंडू स्विंग आणि सीम करण्यास मदत करत होता. हा चेंडू सामन्याच्या पहिल्या दिवशी 80.1 षटकांचा खेळ संपला तेव्हा बदलला होता. त्यामुळे हा चेंडू चालेल असं वाटत होतं. पण हा चेंडू 10.3 षटकांचा खेळ झाल्यानंतरच बदलण्याची वेळ आली. त्यामुळे आता ड्यूक्स चेंडूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

इंग्लंडच्या डावातील 91व्या षटकातील चौथा चेंडू टाकत असताना मोहम्मद सिराज पंचांकडे गेला. तसेच चेंडूचा आकार बदलल्याची तक्रार केली. त्यानंतर पंच सैकत शरपुद्दौला याने साच्यात टाकून चेंडू चेक केला. त्यात चेंडूचा आकार बदलल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर चेंडू बदलण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मैदानात असलेल्या बॉक्समधून एक चेंडू निवडला आणि भारताकडे सोपवला. यानंतर शुबमन गिलचं डोकं फिरलं. पंचांकडे गेला आणि दिलेल्या चेंडूबाबत आक्षेप नोंदवला.

शुबमन गिलने तक्रार केली की दिलेला चेंडू हा 10-11 षटकं वापरलेला दिसत नाही. नियमानुसार, जेव्हा चेंडू बदलला जातो तेव्हा तसाच चेंडू दिला जातो. पण कर्णधार शुबमन गिलचं म्हणणं पंचांनी फेटाळून लावलं. त्यामुळे कर्णधार शुबमन गिल भडकला. गिलने रागाच्या भरात पंचांच्या हातून चेंडू खेचला आणि त्यांच्याशी वाद घालू लागला. त्यानंतर चेंडू पाहिल्यानंतर सिराज आणि आकाशदीपनेही प्रश्न उपस्थित केले. पण पंचांनी त्या दोघानाही दाद दिली नाही.