याला म्हणतात टॅलेंट, ताकत न लावताच shubman gill ने पाकिस्तानी बॉलरला मारला SIX, पहा VIDEO

| Updated on: Sep 27, 2022 | 3:32 PM

शॉट खेळताना ना ताकत लावली, ना बॅट फिरवली, तरी बॉल थेट.... एकदा हा VIDEO बघा

याला म्हणतात टॅलेंट, ताकत न लावताच shubman gill ने पाकिस्तानी बॉलरला मारला SIX, पहा VIDEO
Shubhaman-gill
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: त्याच्या जवळ क्लास आहे, टायमिंग आहे. तो भारतीय क्रिकेटच भविष्य आहे. हा खेळाडू आहे शुभमन गिल. ज्याच्या टॅलेंटची सर्वांनाच कल्पना आहे. टीम इंडियासाठी वनडे फॉर्मेटमध्ये शुभमन गिलने जबरदस्त प्रदर्शन केलं. आता इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये त्याची बॅट तळपत आहे. सध्या तिथे शुभमन खोऱ्याने धावा करतोय.

सोमवारी शुभमन गिल ग्लेमॉर्गनसाठी खेळताना कमालीची इनिंग खेळला. या दरम्यान त्याने पाकिस्तानी गोलंदाज फहीम अशरफच्या चेंडूवर जबरदस्त शॉट मारला. हा फटका चर्चेचा विषय बनला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

होव येथे सुरु असलेल्या सामन्यात शुभमन गिलने ससेक्स विरुद्ध 91 धावा फटकावल्या. खेळ संपताना तो नाबाद होता. गिलने त्याच्या इनिंग दरम्यान 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. दोन पैकी एक सिक्स त्याने पाकिस्तानी स्विंग गोलंदाज आणि ऑलराऊंडर फहीम अशरफच्या बॉलवर मारला. या सिक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गिलने फहीम अशरफच मन मोडलं

शुभमन गिल या मॅचमध्ये तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरला होता. गिल क्रीजवर येताच फहीम अशरफने त्याला बाद करण्याचे अनेक प्रयत्न केले. फहीमने गिलला बाऊन्सर टाकून घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण गिलची नजर शेवटपर्यत चेंडूवर होती. तो फहीमच्या बाऊन्सरवर लेट कटचा फटका खेळला. या बॉलवर त्याने सिक्स मारला. गिलने जोरात बॅट फिरवली नाही. पण चेंडूला दिशा दिली.

पहिल्यांदा काऊंटीमध्ये खेळतोय गिल

शुभमन गिल पहिल्यांदा काऊंटी क्रिकेटमध्ये खेळतोय. झिम्बाब्वेमधील वनडे सीरीज संपल्यानंतर तो इंग्लंडला काऊंटी खेळण्यासाठी निघून गेला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या गिलने पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक फटकावलं. गिलने काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत चार डावात 216 धावा फटकावल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही 70 च्या पुढे आहे. गिल त्याच्या शतकापासून फक्त 9 रन्स दूर आहे.

कधी झळकवली पहिली सेंच्युरी?

शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपतेय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. झिम्बाब्वे विरुद्ध सीरीजमध्येही तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 22 ऑगस्टला हरारेमध्ये शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय करीयरमधील पहिली सेंच्युरी झळकावली.